चाभरा येथे चोरट्यांच्या हल्ल्यात एक जणाचा मृत्यू -NNL

घातपात असल्याची चर्चा ?


अर्धापूर, निळकंठ मदने|
नव्याने अर्धापूर तालुक्यात समावेश झालेल्या चाभरा येथे शुक्रवारी रात्री साडेअकराच्या दरम्यान घरी झोपलेल्या एकाच्या डोक्यात व मानेवर कुऱ्हाडीने सपासप पाच वार करुन ठार केल्याची घटना चाभरा येथे घडल्यांने परीसरात एकच खळबळ उडाली असून,हि घटना घातपात असल्याची जोरात चर्चा आहे, त्यामुळे पोलीस दोन्ही बाजूंनी तपास करीत आहेत.

जिल्हात सर्वत्र शांततेत गणेश विसर्जन होऊन गणेश भक्त व पोलीस नेमकेच झोपले असतांना हादगाव तालुक्यातील त्या सात गावांचा अर्धापूर तालुक्यात समावेश झालेल्या चाभरा येथे शुक्रवारी रात्री दैनंदिन प्रमाणे बालाजी दिगंबर काकडे वय (३५) हे मजदुरी करुन त्यांच्या पत्राच्या घरात झोपले असतांना एक जण हातात कुऱ्हाड घेऊन घरात प्रवेश करुन, बालाजी काकडे यांच्या डोक्यात व मानेवर कुऱ्हाडीने सपासप पाच वार करुन पसार झाला.

आज्ञात व्यक्तींनी चोरी न करता कुऱ्हाडीने वार केल्याने हा घातपात असल्याच्या चर्चेला उधाण आले आहे. या हल्ल्यात काकडे हे गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी नांदेड येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच परीसरात एकच खळबळ उडाली असून, मनाठा पोलिसांनी घातपात असण्याची शक्यता असू शकते अशी माहिती दिल्याचे सुत्रांनी सांगितले. याविषयी अधीक तपास पोलिस करीत आहेत.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी