मुखेड, रणजित जामखेडकर। शहरातील महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या बी.ए., बी.काँम्. शाखेच्या विद्यार्थ्यांनी ५ सप्टेंबर शिक्षक दिनाच्या निमित्ताने दि.७ रोजी सर्वच विभागात कार्यरत असणाऱ्या प्राध्यापकांचा सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते . त्याप्रसंगी महाविद्यालय हे आपले परिवार असून शिक्षण घेणारा आणि देणारा दोघेही एकाच परिवारातील सदस्य असून आपण आपल्या शिक्षकांविषयी कृतज्ञता भाव व्यक्त करत सत्कार समारंभ घेणे म्हणजे शिक्षकांना आयुष्यातील खुप मोठा आनंदाचा क्षण मिळवून देणे होय . संपूर्ण विश्वातील समाज व राष्ट्र उभारण्यात शिक्षक हा केंद्रस्थानी असतो असे विचार प्राचार्य डॉ. एस.बी.अडकिणे यांनी प्रतिपादन केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस.बी.अडकिणे, प्रमुख पाहुणे उपप्राचार्य प्रा.एस.बी.बळवंते , व्यासपीठावर मराठी विभाग प्रमुख प्रा.सी.बी.साखरे , जोशी इन्फोटेकचे संचालक प्रा.जय जोशी हे उपस्थित होते . कार्यक्रमाचे प्रास्ताविक राष्ट्रीय सेवा योजना विभागातील स्वयंसेवक विशाल वाघमारे तसेच सूत्रसंचालन स्वयंसेविका कु.श्रध्दा गेडेवाड तर आभार प्रदर्शन स्वयंसेविका कु.वैष्णवी कुलकर्णी यांनी केले . डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला . विद्यार्थ्यांमध्ये मनोगत स्वयंसेविका कु.शेख नेहा यांनी व्यक्त केले . मुखेड शहरातील एम.के.सी.एल तर्फे प्रा.जय जोशी , जित काँम्प्युटरचे संचालक प्रा.पवन शिरबरतळ , प्रा.बंडे यांनी सुध्दा सर्व गुरुजनांचे प्रमाणपत्र व पुष्प देऊन सत्कार करण्यात आले .
उपप्राचार्य प्रा.बळवंते यांनी शिक्षणाचे महत्त्व , विद्यार्थी - शिक्षक यांच्यामधील नाते , शिकवण यावेळी आपल्या भाषणातून दिली . प्रा.साखरे यांनी गुरू शिष्याची दीर्घ काळापासून चालत आलेली परम्परा , शिक्षकावर असणारी श्रद्धा , प्रेम , आपुलकी आणि शिक्षणाविषयी मोलाचे मार्गदर्शन केले . अध्यक्षीय भाषणात डॉ. अडकिणे यांनी महाविद्यालयाविषयी आपले प्रेम असेच कायम स्मरणात रहावे . विद्यार्थी हा शिक्षकाच्या स्वप्नाला सत्यात आणणारा महत्त्वाचा घटक आहे . शिक्षक हे शिक्षणातून राष्ट्र उभारणीचे कार्य करीत असतो . शिक्षकाचा गौरव म्हणजेच राष्ट्राचा गौरव आहे असे विचार व्यक्त केले . संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन स्वतः विद्यार्थी अतिशय आनंदाने केले . या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रथम , द्वितीय आणि तृतीय वर्षातील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता .