उमरखेड। ईसापूर ता. उमरखेड जि. यवतमाळ येथील जेष्ठ नागरिक कै. भिमराव पाटील मारकवार यांचे वयाच्या 65 व्या वर्षी दीर्घ आजाराने नांदेड येथील दवाखान्यात दुःखद निधन झाले आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा- सून, तीन मुली- जावई व नातू असा फार मोठा परिवार आहे.
त्यांच्या पार्थिवावर उद्या दिनांक 12 सप्टेंबर 2022 रोजी त्यांच्या राहत्या घरी ईसापूर येथे ठिक 11:00 वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. ते माहिती अधिकार तपास समितीचे संस्थापक अध्यक्ष दत्तात्रय पांडुरंग अनंतवार यांचे बंधू रामराव पांडुरंग अनंतवार यांचे सासरे आहेत.