अर्धापुर, निळकंठ मदने| भारत हा लोकशाही प्रधान देश आहे. भारतातील लोकशाही अधिक संपन्न व सज्जग करण्यासाठी मतदारांची भूमिका फार महत्त्वाची असते. प्रत्येकाने आपल्या मतदानाचा हक्क बजावला पाहिजे यासाठी मतदार यादीत नांव असणे आवश्यक आहे व त्यादृष्टीने मतदान कार्ड हे महत्त्वाचे आहे. सध्या मा.भारत निवडणूक आयोगाने निवडणूक ओळखपत्रला आधार कार्डाची लिंक करण्याचे उपक्रम हाती घेतला आहे. विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम अंतर्गत पात्र लाभार्थी यांचे नविन नांव नोंदविणे तसेच प्रत्येक मतदारास आपले मतदारयादी माधिल नावात दुरुस्ती,जुने फोटो असल्यास नविन फोटो टाकून दुरूस्ती, मयत मतदरची नाव कमी करने,मतदार यादीस आधारलिंक करणे, अशी सुविधा निवडणूक आयोगाच्या वोटर हेल्पलाइन या ऐपद्वारे करता येतील.
असे आवाहन सुनील माचेवड नायब तहसीलदार निवडणूक, तहसील कार्यालय अर्धापूर यांनी केले. ते शंकरराव चव्हाण महाविद्यालय अर्धापूर च्या राष्ट्रीय सेवा योजना विभाग व तहसिल कार्यालय, अर्धापूर यांच्या वतीने आयोजित मतदार ओळखपत्राला आधार कार्डशी लिंक करण्याच्या कार्यक्रमा प्रसंगी बोलत होते. याप्रसंगी मंचावर कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. के. के. पाटील हे होते. कार्यक्रमास प्रमुख मार्गदर्शक म्हणून नायब तहसीलदार सुनील माचेवाड हे होते. रासेयो कार्यक्रमाधिकारी डॉ. रघुनाथ शेटे,डॉ. एस. जी.बिराजदार ,प्रा. शंकर देशमुख हे होते. गिरीश गलांडे सहाय्यक निवडणूक विभाग तहसील कार्यालय अर्धापूर यांची उपस्थिती.
याप्रसंगी विद्यार्थ्यांना वोटर हेल्पलाइन या ॲपची माहिती देण्यात आली. ॲपच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी समाजामध्ये प्रत्येक नागरिकांचे मतदार ओळखपत्र आधार कार्डची लिंक करावे असे आवाहन करण्यात आले. या कार्यक्रमास महाविद्यालयातील अनेक विद्यार्थी उपस्थित होते. विद्यार्थ्यांना याप्रसंगी एक डेमो दाखवून मतदार कार्ड हे आधार कार्डशी लिंक करावे हे दाखवण्यात आले.या प्रसंगी विद्यार्थ्यांनी उस्फुर्तपणे आपले ओळखपत्र आधार कार्डची लिंक केले आणि प्रत्येकांचे घरच्यांची निवडणूक ओळखपत्र आधार कार्डशी लिंक करण्याचे घोषित केले. या कार्यक्रमाचे आभार प्रा. शंकर देशमुख यांनी मानले.