गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार
नांदेड| स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड संलग्नित व जागृती सामाजिक प्रतिष्ठान नांदेड संचलित श्री गुरुगोविंद सिंघजी पत्रकारिता महाविद्यालय मालेगाव रोड नांदेड येथे शनिवार दिनांक १७ सप्टेंबर २०२२ रोजी मराठवाडा मुक्ती संग्राम दिन तसेच स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचा वर्धापन दिन सोहळा आयोजित करण्यात आला आहे.
यावेळी सकाळी ८.०५ वाजता स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे माजी संचालक डॉ. रवी एन. सरोदे यांच्या हस्ते ध्वजारोहण सोहळा पार पडणार आहे. त्यानंतर महाविद्यालयातील बी.ए. (एमसीजे), बी. जे . एम. एस. आणि एम. जे. एम. एस. या विद्यापीठातर्फे घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षेतील अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला आहे. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विकास लिंबाजी कदम कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी राहणार आहेत.
या प्रसंगी दिनदयाल कनिष्ठ महाविद्यालयाचे सचिव डॉ. देवदत्त देशपांडे यांची प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहील. स्टेट बँक ऑफ इंडिया मालेगाव शाखेचे व्यवस्थापक मंगेश खापेकर यांची या कार्यक्रमाला विशेष उपस्थिती राहणार आहे. या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन महाविद्यालयाच्या व्यवस्थापकीय समितीचे संचालक विलास वाळकीकर, प्रा. अमोल धुळे, प्रा. संजय नरवाडे, प्रा. विपिन कदम, सौ. शारदा कुलकर्णी, रोहित माळी, बालाजी कुलकर्णी, प्रांजली पुंडगे, श्वेता पाटील, ऋषिकेश बुरकुले, आदित्य कुंटे, भारत सोनटक्के आदींनी केले आहे.