किनवट| दै.मराठवाडा नेताचे किनवट प्रतिनिधी बालाजी सिरसाट यांना पत्रकारिता क्षेत्रातील उत्कृष्ट कार्याबद्दल युवराज्य परिवाराकडून दिला जाणारा सन २०२२ साठीच्या "युवा पत्रकार" पुरस्कार जाहीर झाला आहे.
नांदेडच्या दै. युवराज्य परिवाराच्या वतीने देण्यात येणारा पत्रकारिता क्षेत्रातील सन २०२२ मधील उत्कृष्ट कार्याबद्दलचा पत्रकारिता क्षेत्रातील "युवा पत्रकार" पुरस्कार जाहीर झाल्याचे पत्र नुकतेच बालाजी सिरसाट यांना प्राप्त झाले आहे. दै.युवराज्य "युवा पत्रकार" पुरस्कार सोहळा या आयोजित कार्यक्रमात हा पुरस्कार त्यांना देण्यात येणार असून या पुरस्काराचे स्वरूप हे शाल ,श्रीफळ व सन्मान चिन्ह आणि प्रमाण पत्र हे असणार आहे.
हा पुरस्कार सोहळा दि-२५-सप्टेंबर २०२२ रोजी रविवारी सकाळी ११ वाजता नांदेड येथे मा.खुशाल सिह परदेशी (जिल्हाधिकारी नांदेड.) मा.भीमाशंकर कापसे (अध्यक्ष आझाद ग्रुप) मा. किरण आंबेकर (तहसीलदार नांदेड) मा.शिवसांभ दापकेकर (सेवानिवृत्त महसूल अधिकारी) मा.व्यंकटेश मुंडे ( तहसीलदार लोहा) मा.अनिरुद्ध काकडे ( पोलीस निरीक्षक) मा. प्रमोद टारपे (उपाध्यक्ष आझाद ग्रुप) मा. अजित पाटील (संपादक दै युवराज्य न्यूज नांदेड ) मा.गणेश शिंदे (आवृत्ती संपादक दै. युवराज्य नांदेड) यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पुरस्कार सोहळा नांदेड येथील गणराज पँलेस नमस्कार चौक येथ संपन्न होणार आहे. बालाजी सिरसाट यांना हा पुरस्कार मिळाल्या बद्दल सर्वच क्षेत्रातुन त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.