सर्व मायबाप जनतेला सुख- समृद्धी लाभू दे.. विघ्नहर्ता बाप्पा गणरायाला घातले साकडे
हिमायतनगर| कोरोना महामारीच्या संकट टळल्यानंतर यंदा गणपती बाप्पाचा उत्सव धुमधडाक्यात साजरा करण्यात आला आहे. अनंत चतुर्दशीला आ.माधवराव पाटील जवळगावकर यांनी हिमायतनगर हदगाव तालुक्यातील गणपती बाप्पाचं दर्शन घेतले, यावेळी त्यांनी गणरायाची मनोभावे आरती केली. तसेच यावर्षी अतिवृष्टीच्या तडाख्याने हदगाव हिमायतनगर तालुक्यात ओढवलेल दुष्काळी संकट लवकरात लवकर दूर कर व सर्व मायबाप जनतेला सुखी समृद्ध लाभू दे...असे साकडे विघ्नहर्ता बाप्पा गणरायाला घातले.
आनादीकाळापासून प्रथम पूजनीय गणपती बाप्पाच्या आगमनाने ओढवलेले सर्व संकट टळते अशी भावना परंपरेनुसार चालत आलेली आहे. आजवर गणरायाच्या पाऊलाने विविध संकट टळल्याचे अनेक जुने जाणकार सांगतात. हीच भवन ठेऊन जगभरात गणपती बाप्पाची 10 दिवस उत्साहपूर्ण वातावरणात आराधना केल्यानंतर काल दि 09 रोजी भावपूर्ण निरोप देऊन पुढच्या वर्षी लवकर येण्याची विनंती करण्यात आली. मागील 2 वर्ष कोरोनाच्या संकटामुळे अनेकांनी आपापल्याघरी गणेशोत्सव साजरा केला आहे. यंदा मात्र मोठ्या उत्साहात शहरासह ग्रामीण भागात गणपती बाप्पाचा उत्सव साजरा करण्यात आला. घराघरात गणरायाची प्रतिष्ठापना करून पूजा - आरती करून दुष्काळी संकटातून बाहेर काढ अशी कामना विघ्नहर्ता बाप्पा गणरायाकडे केली गेली.
त्याच प्रमाणे आ माधवराव पाटील जवळगावकर यांनी हिमायतनगर येथे अनंत चतुर्थीला भेट देऊन गणपती बाप्पाचं दर्शन घेऊन आरती केली, तसेच विसर्जन मिरवणुकीत सामील होऊन युवकांच्या आग्रहास्तव ठेका धरला तर टाळ मृदंगाच्या गजरात निघालेल्या गणपती बाप्पाच्या मिरवणुकीत सामील झाले, यावेळी माझ्या शेतकरी राजाला उत्पन्नात भरभराटी देऊन सुख समाधान लाभावे आणि दुष्काळी परिस्थितीची लढण्याची हिम्मत दे... अशी मागणी गणपती बाप्पाकडे केल्याचे त्यांनी नांदेड न्यूज लाईव्हशी बोलतांना सांगितले. तसेच हदगाव- हिमायतनगर मतदार संघातील सर्वाना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी त्यांच्या सोबत डॉ राजेंद्र वानखेडे, रफिक सेठ, परमेश्वर गोपतवाड, अखिल भाई, जनार्धन ताडेवाड, संजय माने, गोविंद बंडेवार, बाकी सेठ, ज्ञानेश्वर शिंदे, पंडित ढोणे, हिंदू मुस्लिम समाजातील काँग्रेस कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.