लोहा/माळाकोळी। मौजे खेडकरवाडी येथील कै. गंगाबाई बालाजीराव खेडकर यांचा बऱ्याच दिवसापासूनचा कर्करोग या दुर्धर आजारांसोबत लढा सुरु होता. मुंबईत उपचार चालू असताना आज सकाळी ठीक नऊ वाजता त्यांची प्राणज्योत मालवली. अंत्यविधी आज दिनांक 15/09/2022 रोजी सायंकाळी 4 वाजता खेडकरवाडी येथे करण्यात येणार आहे.
त्यांना वाचवण्यासाठी कुटुंबातील सदस्यांनी अथक परिश्रम घेतले मात्र यात यश आले नाही. त्यांच्या जाण्यानं कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. त्यांच्या पाठीमागे खूप मोठा परिवार असून, त्या प्रसिद्ध व्यापारी बालाजी तुळशीराम पाटील खेडकर यांच्या पत्नी आणि प्रसिद्ध कापड व्यापारी श्री हनमंतराव शामराव पाटील खेडकर यांच्या स्नुषा होत्या. त्यांना देर जाऊ, चार मुलं, सुना, नातू असा परिवार आहे.