चित्याच्या अगमनापूर्वी वन विकास महामंडळा कडून जनजागृती
शिवणी,प्रकाश कार्लेवाड। नामीबियात दक्षिण आफ्रिकेतून १७ सप्टेंबर रोजी भारतात येणाऱ्या चिता विषयी जनजागृती च्या उद्देशाने किनवट तालुक्यातील शिवणी येथिल जि.प.हायस्कूल व के.प्रा.शाळा शिवणी च्या विध्यार्थ्यांच्या माध्यमातून वनविकास महामंडळाच्या वतीने जनजागृती व विध्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.
या कार्यक्रमात विध्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून वनविकास महामंडळाचे किनवट वन प्रकल्प सहाय्यक व्यवस्थापक अधिकारी के.एन.यादव यांनी चित्ता बाबत विध्यार्थ्यांना विविध माहिती देतांना म्हणाले की,सात दशकानंतर भारतात चिता देशवासियांना उद्याच्या १७ सप्टेंबर रोजी पहावयास मिळणार आहे असे मत व्यक्त केले. यावेळी विचार मंचावर शिवणी वनपरिक्षेत्र अधिकारी जि.एस.पटवेकर, हायस्कूल चे मुख्याध्यापक जि.एस. गोपुलवर,केंद्र प्रमुख पांचाळ प्रा.शाळेचे प्रभारी मुख्याध्यापक एस.एस.पांचाळ सह वनपाल एस.एन.चोले, के.आर.मोरे,एच.पी. नागरगोजे,आदींची उपस्थिती होती.
भारतातून चित्ता नामशेष झाल्याचा सात दशकानंतर भारत आणि नामीबियात जुलै मध्ये चित्ता स्थलांतर णाबाबत करार करण्यात आला व असाच करार दक्षिण आफ्रिका सोबत देखील करण्यात आला होता.या अनुषंगाने चित्ता आणण्याचा तयारीला वेग आलेले असतांना अखेर या आगमनाचे मुहूर्त १७ सप्टेंबर रोजी मध्यप्रदेशातील शयोपुर जिल्ह्यातील कुनो राष्ट्रीय उद्यानात आगमन होणार असल्याचे माहिती समोर येत आहे.या दिवशी दक्षिण आफ्रिकेतून येणारे चित्ते कुनो राष्ट्रीय उद्यानात प्रवेश करतील. या साठी श्योपुर मध्ये सात हेलिपॅड तयार करण्यात येत आहेत.या निमित्ताने १७ सप्टेंबर रोजी देशात आगमन होणाऱ्या चित्त्या संदर्भात जनमानसात जनजागृती व्हावी या साठी शासन स्थरावर विविध विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यां मार्फत जनजागृती करतांना दिसून येत आहे.
या अनुषंगाने वनविकास महामंडळाचे विभागीय व्यवस्थापक अधिकारी जे.डी.पराड वन प्रकल्प किनवट यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक व्यवस्थापक अधिकारी के.एन.यादव यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवणी वनपरिक्षेत्र अधिकारी जि.एस.पटवेकर यांनी आयोजित केलेल्या जि.प.हायस्कूल च्या विध्यार्थ्यांच्या माध्यमातून शिवणी गावात प्रभात फेरी (रॅली) काढून जनजागृती करण्यात आली. या वेळी विध्यार्थ्यांच्या हातात दिशा दर्शक फलक देण्यात आले होते.तर त्या फलकावर वन्य जीव संरक्षण सह झाडे लावा झाडे जगवा असे संदेश देण्यात आले होते.तर या रॅली दरम्यान मनुष्य तभि बनेगा महान,जब मन मे रहेगा जीवों के लिये सन्मान.जीवन मे कोई काम अच्छा करे, वनों और वन्य जिवोंकी सुरक्षा करें ,जैसे करते है हम अपणी सुरक्षा,वैसे ही करें हम वन्य जिवोंकी सुरक्षा,असे अनेक नाम फलक लावून रॅली च्या माध्यमातून जनजागृती करण्यात आली.या वेळी एस.एस.गवळी यांनी ही चिता विषयी विध्यार्थ्यांना विविध माहिती सांगितले.या वेळी कार्यक्रम यशस्वीतेसाठी वनरक्षक बी.एस.वडजे,एन.एस.वाघमारे,एस.एम.सोमासे,पी.एस.पाटील,एम.बी.तारू,एस.यु.वडजे,वनमजूर धोंडिबा हेकाळे, शेख नजीर,सुभाष कोरेवाड,प्रसाद मज्जारवाड सह के.प्रा.शाळा व हायस्कूल चे शिक्षक वृंद उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन जे.बी.मलगे,यांनी केले तर आभार एस.एन.चोले यांनी मानले.
एक काळ असा होता जेंव्हा मध्य आशिया,इराण,अफगाणिस्तान,पाकिस्तान व भारतात मोठ्या प्रमाणात चित्यांचे कळप आढळायाचे भारताच्या राजस्थान, पंजाब,सिंध,गंगा किनाऱ्या पासून बंगाल,बिहार, उत्तरप्रदेश, गुजरात,आणि मध्यप्रदेशच्या जंगलात आशियाई चित्यांची संख्या भरपूर प्रमाणात आढळत असे.काळवीट नीलगाय,या सारख्या अनेक प्राण्यांची शिकार ते करत असत परंतु नंतर च्या काळात त्यांचा वापर शिकारीसाठी करण्यात येऊ लागला.वन्य जीव तज्ञांच्या मते,विसाव्या शतकापर्यंत चित्याच्या संख्येत घट झाली.ई.स.१९१८ ते १९४५ दरम्यान राजा महाराजा आफ्रिकेतून चित्ते मागवून त्यांचा वापर शिकारीसाठी करत असे अशी माहिती मिळते.
एक काळ असा होता जेंव्हा मध्य आशिया,इराण,अफगाणिस्तान,पाकिस्तान व भारतात मोठ्या प्रमाणात चित्यांचे कळप आढळायाचे भारताच्या राजस्थान, पंजाब,सिंध,गंगा किनाऱ्या पासून बंगाल,बिहार, उत्तरप्रदेश, गुजरात,आणि मध्यप्रदेशच्या जंगलात आशियाई चित्यांची संख्या भरपूर प्रमाणात आढळत असे.काळवीट नीलगाय,या सारख्या अनेक प्राण्यांची शिकार ते करत असत परंतु नंतर च्या काळात त्यांचा वापर शिकारीसाठी करण्यात येऊ लागला.वन्य जीव तज्ञांच्या मते,विसाव्या शतकापर्यंत चित्याच्या संख्येत घट झाली.ई.स.१९१८ ते १९४५ दरम्यान राजा महाराजा आफ्रिकेतून चित्ते मागवून त्यांचा वापर शिकारीसाठी करत असे अशी माहिती मिळते.
चिता हा प्राणी एका तासात १०० ते १२० कि.मी. इतका धावतो,तर चित्याच्या मांजरीच्या वंशज असे संबोधिले जाते.तर एकंदरीत चिता हा प्राणी चतुर व चंट असल्याचे सांगितले जाते.चित्या बद्दल इतकं सांगण्याचे कारण असे की,आफ्रिकेतील नामीबिया येथून आठ चित्यांचे भारतात पुनवर्सन केले जाणार आहे.यात पाच नर आणि तीन मोदींचा समावेश आहे.नागपूर नजीकच्या मध्यप्रदेशातील कुनो राष्ट्रीय उद्यानात हे चित्ते १७ सप्टेंबर रोजी सोडल्या जाणार आहेत.चक्क एका खंडातून दुसऱ्या खंडात मांसाहारी प्राण्यांचे पुनर्वसन करणे नक्कीच सोपे नाही. परंतु असे करणे शक्य आहे. - के.एन.यादव वनविकास महामंडळ वन प्रकल्प सहाय्यक व्यवस्थापक अधिकारी किनवट.