समाजभूषण पुरस्कार मिळाल्याबद्दल उत्तमराव गवाले यांच्या नागरी सत्काराचे आयोजन -NNL


नायगाव।
तालुक्यातील कोलंबीचे भूमिपुत्र तथा समाजहितैषी व्यक्तिमत्त्व उत्तमराव गवाले यांना स्नेहबंधन सामाजिक परिवर्तन प्रतिष्ठान अंबरनाथ , मुंबईच्या वतीने सामाजिक कार्याबद्दल दिला जाणारा सन्मानाचा असा समाजभूषण पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांच्या जाहीर नागरी सत्कार व प्रबोधन कार्यक्रमाचे आयोजन दिनांक ११/९/२०२२रोजी सायंकाळी पाच वाजता कोलंबी येथे करण्यात आले आहे.

या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून सुप्रसिद्ध साहित्यिक तथा व्यक्तिमत्त्व विकासतज्ज्ञ डॉ हनुमंत मारोतीराव भोपाळे हे राहणार असून प्रमुख वक्ते म्हणून जलनायक बाबुराव केंद्रे, राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त शिक्षक तथा साहित्यिक शिवा कांबळे, राज्य पुरस्कारप्राप्त शिक्षक पंडित पवळे यांचे मार्गदर्शन लाभणार आहे.

प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषद नांदेडचे माजी शिक्षण सभापती शिवराज पाटील होटाळकर, युवानेते भास्करदादा भिलवंडे,  पंचायत समितीच्या माजी सभापती प्रभाबाई कत्ते यांची उपस्थित लाभणार आहे.तरी या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन नागरी सत्कार समिती आणि समस्त कोलंबी वासीयांनी केले आहे.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी