सिरंजनी येथे आठ वर्षा पासून दारू व जुगार बंद; सार्वजनिक बाल गणेश मंडळाच्या वतीने 22 तरुनाचे रक्तदान -NNL


हिमायतनगर/सिरंजनी।
तालुक्यातील सिरंजनी येथे गेल्या  आठ वर्षापासून दारू व जुगार बंद असल्याची माहिती , सरपंच प्रतिनिधी पवन करेवाड ,माजी सरपंच सुभाष शिल्लेवाड, धम्मा मुनेश्वर  गणेश  राऊलवार ग्रा.प. सदस्य, पंजाब राऊत, प्रकाश मुद्दनवाड ,यांनी दिली. सार्वजनिक बालगणेश मंडळाच्या वतीने आयोजित रक्तदान शिबीरात 22 तरुणाने रक्तदान केले असल्याची माहिती अध्यक्ष दता काञे, उपाध्यक्ष राजेश सुर्यवंशी, सचिव प्रमोद करेवाड यांनी दिली आहे.

सिरंजनी हे चार ते पाच हजार वस्तीचे गाव असून सर्व गावात दारूची एकही  दुकान नाही. दारू विक्री बंदीसाठी ग्रामसभेत ठराव पास करण्यात आला होता. त्या अनुषंगाने गावात दारू विकण्यास त्यांनी मनाई केली होती. पोळा गणेशोत्सवाच्या शांतता कमिटीच्या बैठकीत पोलीस निरीक्षक यांनी सिरंजनी गावचा आदर्श दारूबंदीच्या बाबतीतला घ्यावा. सरपंच प्रतिनिधी पवन करेवाड आदर्श अन्य गावाने घ्यावा असे आवहान पो.नि. भूसनूर यांनी केले. 

सिरंजनीने दारूबंदीचा ग्रामसभेत ठराव घेतला होता, तेव्हापासून आतापर्यंत गावात दारू विक्री बंद आहे. त्यासाठी गावकऱ्यांनी मोठी साथ दिली . तालुक्यात दारुचा थेंबही न विक्री करणारे गाव सिरंजनी असे पवन करेवाड यांनी सांगीतले आहे..गावातील विधायक कामात तरुणाचा मोठा सहभाग असतो. तरुण वर्गने ग्रामस्वच्छतेत सहभाग घेतला होता.सर्व समाजाचा जातीधर्माचा एकोपा आहे. सिरंजनी गावची आदर्श गाव करण्याची सरपंच,उपसरपंच, सदस्य यांची धडपड आहे.

 तालुक्यात सिरंजनी गाव हे अति संवेदनशिल होते.निवडणूकी पूरते दोन तिन आठवडे राजकारण नंतर संवाद, आपुलकी, एकमएकांना सहकार्य आहे  असे पवन करेवाड ,सुभाष शिलेवाड, धम्पा मुनेश्वर,गणेश राहुलवार, मधूकर राऊत, पंजाब राउत, यांनी सांगीतले,नवतरुण कामाला लागले असून गावात दारु विक्री व जुगार बंद आहे. शिक्षण व आरोग्य यावर भर दिला आहे.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी