नगरसेवक श्रीनिवास जाधव यांच्या १५. लक्ष रु. निधीतून विकास कामाचे भूमिपूजन -NNL


नविन नांदेड।
सिडको येथील प्रभाग क्रमांक (२०) चे नगर सेवक श्रीनिवास जाधव यांच्या स्थानिक दलीत वस्ती सुधार विकास योजना निधि अंतर्गत १५ लक्ष रुपयाचा निधीच्या विकास कामाचे भूमिपूजन सिडको एन. डी.४१.के.२ राहूल नगर भागातील दिक्षा बौद्ध विहाराच्या मोकळ्या जागेत दि.२८ आगसष्ट रोजी सभागृहाचे भूमिपूजन नांदेड मनपाचे माजी उपमहापौर विनय पाटील गिरडे यांच्या हस्ते नारळ फोडून करण्यात आले.     

यावेळी व्यासपीठावर माजी स्थायी समिती सदस्य तथा नगरसेवक श्रीनिवास जाधव, सिडको ब्लॉक काँग्रेस कमिटी अध्यक्ष विनोद कांचनगिरे, माजी नगरसेविका प्रा. डॉ. ललिता शिंदे बोकारे, भि. ना.गायकवाड, राजू लांडगे, किशनराव रावणगावकर, जित्तू सिंघ टाक, दशरथ कंधारे, पांडुरंग नगारे,श्रीमती पार्वती कोरडे यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या प्रारंभी तथागत गौतम बुद्ध व भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पुष्पपूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. तद्नंतर  माजी उपमहापौर विनय पाटील गिरडे, व नगरसेवक श्रीनिवास जाधव, यांनी दिलेल्या विकास कामाचे आश्वासन पूर्ण केल्याबद्दल वॉर्डातील सर्व नागरिकांच्या वतीने त्यांचा भव्य सत्कार करण्यात आला. 

यावेळी ॲड.रोहित राठोड, प्रितम लिंबेकर, गुत्तेदार अब्दुल मुजीब, राम गायकवाड, रिंकू सावळे, कोंडीबा खंदारे, आनंद थोरात, भगवान थोरात, सचिन थोरात, दिलीप भालेराव, मनोज कांबळे, शिवाजी कांबळे,सौ. कड्याबाई सावळे, सखूबाई सावळे, गोडबोले बाई, श्रीमती सिताबाई गायकवाड, मनिषा हाटकर, यांच्या सह वार्डातील अनेक नागरिकांची उपस्थिती होती. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी नामदेव पदमने,प्रल्हाद जोगदंड, भगवान जोगदंड, गणेश खंदारे यांनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन प्रा.शशीकांत हाटकर यांनी केले.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी