राष्ट्रीय बेसबॉल स्पर्धेत तेलंगणा ला विजेतेपद -NNL

२८ आगस्ट रोजी कौठ्यात सांगता  - स्पर्धेत ११ राज्य सहभागी


नांदेड|
जेष्ठ स्वातंत्र्यसेनानी  भाई डॉ. केशवराव धोंडगे यांच्या शतकोत्सवी वर्षानिमित्त शारिरिक शिक्षण महाविद्यालय पटांगण, कौठा येथे  बी एस एफ आय सब ज्युनियर ( १५ वर्षाखालील)  राष्ट्रीय बेसबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले  होते. या स्पर्धेत मुलांच्या गटात पौंडेचरी व मुलींच्या गटात मध्यप्रदेश संघान  प्रथम क्रमांक मिळविला. २८ आगस्ट रोजी या स्पर्धा संपन्न झाल्या. 

महाराष्ट्र बेसबॉल संघटनेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या राष्ट्रीय बेसबॉल स्पर्धेत १० राज्यातील  जवळपास ३००  खेळाडू या स्पर्धेत सहभागी झाले होते.. बेसबॉल राष्ट्रीय स्पर्धेत मुलांच्या गटात पौंडेचरी ( प्रथम) ,  तेलंगणा (द्वितीय), तर दिल्ली संघाने तिसरा क्रमांक पटकावला. मुलींच्या गटात मध्यप्रदेश संघा(प्रथम) तेलंगणा ( द्वितीय ). तर यजमान महाराष्ट्र संघाने तिसरा क्रमांक मिळवला. दि. २८ आगस्ट रोजी बक्षीस वितरण पार पडले. यावेळी डॉ. भाई पुरुषोत्तम धोंडगे, प्राचार्य डॉ. बळीराम लाड,  फिदा हुसेन (काश्मीर )शेख अशफाख, संयोजक सचिव डॉ. राहुल वाघमारे उपस्थित होते. 

बक्षीस वितरण समारंभाचे संचलन व आभार दिगंबर शिंदे यांनी मानले.  राष्ट्रीय बेसबॉल स्पर्धेसाठी डॉ. राहुल वाघमारे, दिगंबर शिंदे, विनोद जमदाडे, राहुल चंदेल, किरण नागरे, संतोष कांबळे, ग्यानोबा गिरडे, संदीप कदम, मुकुंद डमरे, काशीम खान चाणक्य भोस्कर, वैजनाथ नावंदे, अशफाक सय्यद, शिवाजी जाधव, मोहम्मद कैफ, निलेश डोंगरे, संदीप कदम परीश्रम घेत आहेत. राष्ट्रीय पंचाची भुमिका जुन दत्ता, महेश सौदीया, शुभम यादव, मयुरी उच्चेसरे, राज सोनी, हिरकज्योत सोनवाल  यांनी परीश्रम घेतले. 


Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी