बंगालमधील हिंदूंसारखी स्थिती अन्य राज्यांत होऊ नये, यासाठी हिंदूंनी सतर्क रहा ! - श्री. प्रकाश दास, अध्यक्ष, पश्चिम बंगेर जन्य -NNL

हिंदु जनजागृती समिती आयोजित विशेष संवाद :  ‘पश्चिम बंगालच्या हिंदूंची वर्तमान स्थिती !’


मुंबई|
वर्ष 1946 मध्ये भारताच्या स्वातंत्र्यापूर्वी ‘डायरेक्ट एक्शन डे’च्या अंतर्गत मुसलमानांनी पश्चिम बंगाल प्रांत आणि तेव्हाचा पूर्व बंगाल (आताचा बांगलादेश) येथे हिंदूंवर आक्रमणे केली. तेव्हापासून ते आजपर्यंत या भागात हिंदूंवर आक्रमणे चालूच आहेत. मुसलमानांच्या आक्रमकांना हिंदू प्रतिकार करत आहेत; मात्र राज्य सरकारची दमननीती हिंदूंना रोखत आहे. असे जरी असले, तरी हिंदू जागृत होत आहेत आणि लढा देत आहे. 

बंगालमधील सध्याची स्थिती इस्लामिक राष्ट्रासारखी झाली आहे. बंगालमधील हिंदूंसारखी स्थिती भारतातील अन्य राज्यांत होऊ नये, यासाठी हिंदूंनी सतर्क राहणे आवश्यक आहे, असे आवाहन कोलकाता, बंगाल येथील ‘पश्चिम बंगेर जन्य’चे अध्यक्ष श्री. प्रकाश दास यांनी केले. हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘पश्चिम बंगालच्या हिंदूंची वर्तमान स्थिती !’ या विषयावरील ‘ऑनलाईन’ विशेष संवादात ते बोलत होेते.

श्री. प्रकाश दास पुढे म्हणाले की, बांगलादेशाची सीमा बंगालसह भारताच्या ५ राज्यांना लागून आहे आणि या सर्व राज्यांत बांगलादेशी घुसखोरी चालूच आहे. बंगाल राज्य आता एक ‘स्लीपर सेल’ झाले आहे. घुसखोर बांगलादेशी मुसलमानांना सर्व सोयी-सुविधा उपलब्ध करून येथे राहू दिले जाते, मात्र बांगलादेशातून नाईलाजाने स्थलांतरीत झालेल्या हिंदूंकडे दुर्लक्ष केले जाते. बंगालमधील वर्तमान ममता बॅनर्जी शासन काळात हिंदूंवर आक्रमणे तर होतच आहे.

मात्र हिंदूंवर आक्रमणे किंवा अन्याय झाल्याची साधी तक्रार सुद्धा येथे पोलीस-प्रशासन नोंदवून घेत नाही. सरकारी योजना, सोयीसुविधा केवळ मुसलमानांना दिल्या जातात आणि हिंदूंना यांपासून वंचित ठेवले जात आहे. बंगालला सांस्कृतिक इतिहास लाभला असून येथे अनेक संत-महात्मे होऊन गेले आहेत. त्यांचा आदर्श ठेवून येथील संघर्षपूर्ण स्थितीत हिंदू संघटनांचे आमचे कार्य सुरूच राहील, असे श्री. दास म्हणाले.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी