उस्माननगर। येथील मध्येवस्ती जवळील बडा नालसाब ( सवारी ) येथे बांधकाम करून टाकलेले दगडमातीत एका सुराकातून भारतीय नागाला (विष्णुपुरी ) नांदेड येथील सर्प अभ्यासक यांनी पकडून जंगलात नेऊन सोडले आहे.
उस्माननगर येथील मध्यवस्तीत बडानालसाब (सवारी) येथे घर पाडून दगडमाती बाजूला टाकली होती.मोठमोठे सुराक होते.नागरिक तिथे काम करत असताना अचानक नाग दिसल्याने उपस्थित नागरिक भयभीत झाले होते.कोन्ही मारण्यासाठी समोर येत नसल्यामुळे गावातील ईस्माइल तांबोळी यांनी विष्णुपुरी नांदेड येथील सर्प अभ्यासक. विक्रम सारंग , व सर्प मित्र अरविंद हाटकर यांना फोन करून ताबडतोब बोलावून घेतले.त्यांनी खुप हुशारी आणि चालाकीने नागाला पकडून घेतले.
भारतात चार विषारी सापांच्या जाती आहेत. त्यामधील नाग हा विषारी साप आहे. सर्प मित्र यांनी २० ते २५ मिनिटांत उस्माननगर येऊन सापाला पकडल्याने अनेकांनी श्वस सोडला .सर्प मित्र व अभ्यासक यांनी गावकऱ्यांना सापा विषयी मार्गदर्शन केले कोणीही घाबरून जाऊ नये.सापा बध्दलची अंधश्रद्धा त्यांनी दूर केली आहे.सर्प मित्र अरविंद हाटकर व साप आभ्यासक विक्रम सारंग यांनी आतापर्यंत अनेक सापाना जंगलात सोडले असल्याचे प्रतिनिधींशी बोलताना सांगितले.

