नांदेड| भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त शहरातील देगाव चाळ येथील बँकाॅक थायलंडचे प्रादेशिक केंद्र प्रज्ञा करुणा विहारात इयत्ता चौथी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी राज्यस्तरीय भाषण स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेचा निकाल जाहीर झाला असून या स्पर्धेत विजया हटकर ही विद्यार्थीनी प्रथम पारितोषिकाची मानकरी ठरली असून अवंती कदम आणि शितल लोखंडे यांनी द्वितीय क्रमांक पटकावला. तृतीय राहुल कदम यास तर उत्तेजनार्थ पारितोषिक अनुष्का लोणे, अक्षदा नरवाडे, समीक्षा सोनुले यांना मिळाले. यावेळी नागोराव डोंगरे, प्रज्ञाधर ढवळे, मारोती कदम, शंकर गच्चे, संतोष घटकार, अडवोकेट अनिल सदावर्ते, माणिकराव हिंगोले, विजय थोरात, सुभाष लोखंडे यांची उपस्थिती होती.
येथील सप्तरंगी बहुउद्देशीय सेवाभावी संस्था संचलित सप्तरंगी साहित्य मंडळाच्या वतीने आयोजित केलेल्या ५९ व्या काव्य पौर्णिमा कार्यक्रमातील सप्तरंगी मंडळाच्या साहित्यिकांनी घेतलेल्या सहभागामुळे काव्य पौर्णिमेत चांगलीच रंगत आणली. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त शहरातील देगाव चाळ येथील प्रज्ञा करुणा विहारात काव्य पौर्णिमा कार्यक्रम घेण्यात आला. गत पौर्णिमेला आंबेडकरी समाज आणि स्वातंत्र्य चळवळ या विषयावर इयत्ता चौथी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी राज्यस्तरीय भाषण स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात आला. यात पहिले पारितोषिक ज्येष्ठ पत्रकार तथा सामाजिक कार्यकर्ते जी. पी. मिसाळे यांच्या वतीने तर द्वितीय स्तंभलेखक शंकर गच्चे यांच्यावतीने आणि तृतीय पारितोषिक आदर्श शिक्षक तथा साहित्यिक मारोती कदम यांच्या वतीने प्रदान करण्यात आले. उत्तेजनार्थ बक्षीस नागोराव डोंगरे, संतोष घटकार आणि प्रज्ञाधर ढवळे यांनी दिले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला तथागत गौतम बुद्ध आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचे दीप, धूप आणि पुष्प पूजन करण्यात येवून अभिवादन केले. त्रिरत्न वंदनेनंतर मान्यवरांची भाषणे झाली. त्यानंतर भाषण स्पर्धा विजेत्यांना पारितोषिके प्रदान करण्यात आले. खीरदानानंतर कार्यक्रमाची सांगता झाली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रज्ञाधर ढवळे यांनी केले तर सूत्रसंचालन व आभार सुभाष लोखंडे यांनी मानले. कार्यक्रमास माता रमाई आंबेडकर महिला मंडळ देगावचाळ नांदेडच्या अध्यक्षा तथा सामाजिक कार्यकर्त्या शिल्पा लोखंडे, निर्मलाबाई पंडित, शोभाबाई गोडबोले, सविताबाई नांदेडकर, रेखाबाई हिंगोले, गयाबाई नरवाडे, सुनीताबाई इंगोले, अडवोकेट मायाताई राजभोज, चौत्राबाई चिंतुरे, सुमनबाई वाघमारे, आशाबाई हाटकर, शोभाबाई पवार यांच्यासह परिसरातील मोठ्या संख्येने नागरिक पुरुष महिला, बालक, बालिका उपस्थित होते.