पुणे। हिंजवडी खिंडीतील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समूहामध्ये असलेल्या कृष्ण मंदिरात कृष्ण जन्माष्टमी आणि गोपाळकाला महोत्सव आयोजित करण्यात आला .
भजन, कीर्तनाबरोबर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली.मंदिराच्या संस्थापक बाळूबाई धुमाळ, दिलीप धुमाळ, रविकांत धुमाळ यांनी स्वागत केले. या जन्माष्टमी सोहळ्यात इस्कॉन संस्था देखील सहभागी झाली.