लोहा| सेतू सुविधा केंद्राच्या माध्यमातून गरजू लाभार्थ्यांची वेळेत प्रमाणपत्र मिळावेत शासकीय योजनांची अंमलबजावणी व्हावी त्यासाठी शासकीय ऑफिस व नागरिक यातील सेतू व्हावा असे प्रतिपादन भाजपा प्रदेश महिला आघाडीच्या उपाध्यक्षा प्राणिताताई देवरे चिखलीकर यांनी केले.
लोह्यात माजी उपनगराध्यक्ष छत्रपती धुतमल यांच्या पुढाकाराने सुरू झालेल्या तनय धुतमल यांच्या सेतू सुविधा -आपले सरकार केंद्राचे उदघाटन प्राणिताताई देवरे चिखलीकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी तहसीलदार व्यंकटेश मुंडे, प्रसिद्ध फिजिशियन डॉ डी बी कानवटे यांची विशेष उपस्थिती होती.
उदघाटन सोहळ्या नंतर झालेल्या छोटेखानी कार्यक्रमा साठी प्राणिताताई देवरे चिखलीकर ,तहसीलदार मुंडे, उपनगराध्यक्ष दता वाले, काँग्रेस शहराध्यक्ष वसंतराव पवार, माजी सभापती मारुती पाटील बोरगावकर,गटनेता करीम शेख, संयोजक माजी उपनगराध्यक्ष छत्रपती धुतमल, विठ्ठलेश्वर शिक्षण संस्थेचे संचालक लक्ष्मीकांत बिडवई नगरसेवक बालाजी खिल्लारे, अमोल व्यवहारे, भास्कर पाटील पवार, नबी शेख, नामदेव पाटील, माजी नगराध्यक्ष व्ही के कांबळे, ई जे बनसोडे,पत्रकार संघाचे अध्यक्ष शेख अहमद, पोलीस पाटील श्रीरंग महाबळे, प्रवीण धुतमल, अनिल धुतमल, शहाजी पवार, सुधाकर पवार, निहाल अहमद, खादर मामु यासह मान्यवर उपस्थित होते.
प्राणिताताई देवरे चिखलीकर यांनी सेतू सुविधा केंद्राची सोय सामान्य नागरिकांची सोय करणारी आहे.छत्रपती धुतमल, हरिहर धुतमल व परिवार हे नेहमीच लोकोपयोगी कामासाठी खा चिखलीकर यांच्याकडे पाठपुरावा करत असतात. ही सुविधा नागरिकांना उपयुक्त ठरणार आहे.सेतू सुविधा केंद्राचे उदघाटन झाले असे त्यांनी जाहीर केले.
तहसीलदार मुंडे यांनी सेतू सुविधा केंद्रातून शासकीय पातळीवर लागणाऱ्या योजना व कागदपत्रांची पूर्तता व्हावी यासाठी विविध प्रमाणपत्र दिले जाते शहरात आणखी एका सेतू केंद्राची भर पडली. आणि त्याचा या भागातील जनतेला फायदा होणार आहे असे सांगितले. आरंभी माजी उपनगराध्यक्ष छत्रपती धुतमल , यांनी प्राणिताताई देवरे तसेच तहसीलदार मुंडे यांचा सत्कार केला. अरुण धुतमल, भीमराव धुतमल,अनिल धुतमल, प्रवीण धुतमल, इमाम लदाफ, रत्नाकर महाबळे, बालाजी धनसडे, तनय धुतमल यांनी मान्यवरांचा सत्कार केला.हरिहर धुतमल यांनी प्रास्ताविक केले तररत्नाकर महाबळे यांनी संचलन व इमाम लदाफ यांनी आभार मानले,