शितल साठे यांच्या नवयान महाजलसा, प्रबोधन सभा..
नविन नांदेड। लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती सोहळा निमित्ताने २७ व २८ ऑगस्ट रोजी प्रबोधन सभा, प्रबोधन जलसा, महारली व सभा ,शितल साठे व सचिन माळी यांच्या नवयान महा जलसा मधुन अण्णा भाऊ साठे यांना अभिवादन करण्यात आले ,या दोन दिवशिय कार्यक्रम मुळे सिडको वासियांना विविध कार्यक्रमांची मेजवानी मिळाली.
साहित्य सम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती सोहळा सिडको चा वतीने दरवर्षी प्रमाणे याही वर्षी २७ रोजी सकाळी ९ वाजता मनपाचे सेवानिवृत्त कार्यकारी अभियंता सुग्रीव अंधारे यांच्या हस्ते सकाळी ९ वाजता ध्वजारोहण करण्यात आले यावेळी समाज बांधव यांच्या सह परिसरातील सामाजिक व राजकीय व शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते, दुपारी चार वाजता बापुराव जमदाडे शिराढोणकर यांच्या प्रबोधन गिताचा कार्यक्रमा मधुन अण्णा भाऊ साठे यांच्या जिवन चारित्र्यावर अनेक गिते सादर केली.
तर सायंकाळी सहा वाजता प्रबोधन सभा भाजपा नगरसेविका सौ बेबीताई गुपीले यांच्या अध्यक्षतेखालील झालेल्या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून भाजयुमो शहर जिल्हाध्यक्ष संजय पाटील घोगरे, भाजयुमो सिडको अध्यक्ष गजानन कते, सुग्रीव वाघमारे, साहेबराव मामीलवाड, निवृत्ती जिंकलवाड,जिंतुसिंह टाक,प्रमोद मैड, माजी संरपच अंबटवार, यांच्या सह मान्यवरांच्यी उपस्थिती होती, या वेळी प्रमुख वक्ते डॉ.राजेशवर दुडकनाळे यांनी अण्णा भाऊ साठे यांच्या जिवन चारित्र्यावर प्रकाश टाकुन मार्गदर्शन केले,
२८ रोजी सकाळी दहा वाजता महारली आयोजन सिडको परिसरातील मुख्य मार्गने पुर्णकृती असलेल्या अण्णा भाऊ साठे यांच्या पुतळा असलेली महारली वाद्यवृंद असलेल्या ढोल ताशाचा गजरात काढण्यात आली यावेळी परिसरातील विविध ठिकाणी जल्लोष पुर्ण स्वागत विविध ठिकाणी करण्यात आले, यावेळी अण्णा भाऊ साठे स्मारक या ठिकाणी खिचडी वाटप करण्यात आले तर सायंकाळी पाच वाजता प्रबोधन सभा ऊधोजक माधव डोंपले यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली यावेळी प्रमुख वक्ते दिपा कांबळे राऊतखेडकर यांनी मार्गदर्शन केले.
यावेळी उपमहापौर विनय पाटील गिरडे,सतिश पाटील बसवदे, विठ्ठल गायकवाड,राजु लांडगे, सुदर्शन कांचनगिरे,माजी नगरसेविका ललिता शिंदे, डॉ.करूणा जमदाडे, डॉ.नरेश रायेवार, डॉ.अशोक कंलत्री, भि.ना.गायकवाड, संकेत पाटील,विनोद कांचनगिरे,उदय देशमुख, चंद्रकांत मेकाले यांच्या संह निमंत्रित मान्यवरांच्यी ऊपसिथी होती, सायंकाळी ७ वाजता शितल साठे व सचिन माळी यांच्या नवयान महाजलसा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी अण्णा भाऊ साठे यांच्यी गाजलेली लोकगिते,पोवाडा, व गायनातुन आण्णा भाऊ साठे यांच्या जीवनावर आधारित गिते सादर केली, यावेळी ऊपसिथीत असलेल्या समुदायांनी टाळ्याचा गजरात प्रतिसाद दिला.
या जयंती सोहळा निमित्ताने आयोजित कार्यक्रमास मंडळाचे पदाधिकारी अध्यक्ष पप्पु गायकवाड, श्रीरंग खानजोडे , नितीन वाघमारे, मुन्ना कोलंबीकर, बाबुराव कांबळे, बालाजी बंसवते, शिवाजी वाघमारे,आंनदा वाघमारे, राजकुमार जांभळीकर, विठ्ठल घाटे, रणजित बाराहाळीकर, अवधुत आंबटवार, यशवंत गादेकर, बालाजी पाटोळे,विजय गायकवाड,प्रा.बालाजी गवारे व कार्याध्यक्ष निवृत्ती कांबळे व स्वागत अध्यक्ष दलीत मित्र नारायण कोंलबीकर यांच्या सह पदाधिकारी यांनी परिश्रम घेतले.