नांदेड| दक्षिण मध्य रेल्वे नांदेड ते कर्नाटक राज्यातील हुबळी आणि नांदेड ते तिरुपती दरम्यान दोन विशेष गाड्या चालविणार आहे.
ते पुढील प्रमाणे – 1) नांदेड-हुबळी विशेष रेल्वे साप्ताहिक सेवा: गाडी क्रमांक 07635 हि गाडी दिनांक 6 ऑगस्ट, 2022 रोजी शनिवारी दुपारी 14.10 वाजता सुटेल आणि पूर्णा, परभणी, गंगाखेड, परळी, लातूर रोड, लातूर, उस्मानाबाद, बार्शी टाऊन, कुर्डूवाडी, पंढरपूर, सांगोला, मिरज, घाटप्रभा, बेळगावी, लोंढा जं., धारवाड मार्गे हुबळी येथे दुसऱ्या दिवशी रविवारी सकाळी 09.00 वाजता पोहोचेल. 2) हुबळी – नांदेड विशेष रेल्वे साप्ताहिक सेवा: गाडी क्रमांक 07636 हि गाडी दिनांक 7 ऑगस्ट, 2022 रोजी रविवारी सकाळी 11.15 वाजता सुटेल आणि आलेल्या मार्गानेच आणि नांदेड येथे सोमवारी सकाळी 08.10 वाजता पोहोचेल.
3) नांदेड-तिरुपती विशेष रेल्वे साप्ताहिक सेवा : गाडी संख्या 07633 नांदेड-तिरुपती विशेष गाडी दिनांक 6 ऑगस्ट, 2022 रोजी नांदेड येथून दुपारी 12.00 वाजता सुटेल आणि पूर्णा, परभणी, गंगाखेड, परळी, वैजनाथ, लातूर रोड, उदगीर, भालकी, बिदर, झहीराबाद, विकाराबाद, तांदूर, सेरम, चात्तापूर, सुलेहाल्ली, यादगीर, कृष्णा, रायचूर , मंत्रालयम रोड, अदोनी, गुंटकळ, गुती, तादिपात्री, यार्रागुंतला, कडप्पा, आणि रेणीगुंठा मार्गे तिरुपती येथे दुसऱ्या दिवशी सकाळी 08.30 वाजता पोहोचेल. 4) तिरुपती – नांदेड विशेष रेल्वे साप्ताहिक सेवा : गाडी संख्या 07634 तिरुपती-नांदेड विशेष गाडी दिनांक 7 ऑगस्ट, 2022 रोजी तिरुपती येथून रात्री 21.10 वाजता सुटेल आणि गेलेल्या मार्गानेच नांदेड येथे दुसऱ्या दिवाशी सायंकाळी 17.20 वाजता पोहोचेल. 5) दोन्ही या गाडीमध्ये वातानुकुलीत, स्लीपर आणि जनरल चे डब्बे असतील.