नांदेड| दक्षिण मध्य रेल्वे हैदराबाद ते नगरसोल दरम्यान चार विशेष गाड्या चालवायचे ठरविले आहे, ते पुढील प्रमाणे ---
1) हैदराबाद-नगरसोल विशेष रेल्वे सेवा: गाडी क्रमांक 07089 हि गाडी दिनांक 24 ऑगस्ट, 2022 रोजी हैदराबाद येथून शनिवारी सायंकाळी 19.00 वाजता सुटेल आणि विकाराबाद-परळी-परभणी-जालना-औरंगाबाद मार्गे नगरसोल येथे दुसऱ्या दिवशी रविवारी सकाळी 09.25 वाजता पोहोचेल.
2) नगरसोल-हैदराबाद विशेष रेल्वे सेवा: गाडी क्रमांक 07090 हि गाडी दिनांक 25 ऑगस्ट, 2022 रोजी नगरसोल येथून रविवारी रात्री 22.00 वाजता सुटेल आणि आलेल्या मार्गानेच आणि हैदराबाद येथे सोमवारी दुपारी 13.00 वाजता पोहोचेल.
3) हैदराबाद-नगरसोल विशेष रेल्वे सेवा: गाडी क्रमांक 07050 हि गाडी दिनांक 27 ऑगस्ट, 2022 रोजी हैदराबाद येथून शनिवारी सायंकाळी 19.00 वाजता सुटेल आणि विकाराबाद-परळी-परभणी-जालना-औरंगाबाद मार्गे नगरसोल येथे दुसऱ्या दिवशी रविवारी सकाळी 09.25 वाजता पोहोचेल.
4) नगरसोल-हैदराबाद विशेष रेल्वे सेवा: गाडी क्रमांक 07051 हि गाडी दिनांक 28 ऑगस्ट, 2022 रोजी नगरसोल येथून रविवारी रात्री 22.00 वाजता सुटेल आणि आलेल्या मार्गानेच आणि हैदराबाद येथे सोमवारी दुपारी 13.00 वाजता पोहोचेल. 5) दोन्ही या गाडीमध्ये वातानुकुलीत, स्लीपर आणि जनरल चे डब्बे असतील.