मुखेड| तालुक्यातील मौजे हसनाळ (प.दे.) येथील ज्येष्ठ नागरिक पद्मिनबाई चांदोबा कांबळे (वय ७५) यांचे अल्पशा आजाराने नांदेड येथील खाजगी रुग्णालयात उपचारादरम्यान रविवार दि.२८ ऑगस्ट रोजी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास निधन झाले. त्यांच्या पश्चात पती,तीन मुले,पाच मुली, सुना, नातवंडे, पंतवडे असा मोठा परिवार आहे.
महाराष्ट्र शासनाच्या पशुसंवर्धन विभागाचे राज्य उपायुक्त डॉ.प्रकाशजी हसनाळकर यांच्या मातोश्री होत्या. अतिशय प्रतिकूल परिस्थितीत मुलांना शिक्षण देऊन प्रशासकीय अधिकारी घडविणारी एक आदर्श महिला म्हणून पद्मिनीबाई यांच्याकडे पंचक्रोशीत पाहिले जायच पद्मिनीबाई यांच्यावर पाच मुली तीन मुलं असा मोठा परिवार सोबतीला असतानाही घरात पाच कर्मचारी घडवणारी एक आदर्श महिला होत्या.
पद्मिनबाई हसनाळकर यांच्या पार्थिव देहावर सोमवार दि.२९ ऑगस्ट रोजी दुपारी १२:३० वाजता हसनाळ (प.दे) येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.यावेळी उपजिल्हाधिकारी भारत कदम,जिल्हा परिषद सदस्य दशरथराव लोहबंदे,मा.प.स.सदस्य राजू घोडके,मा.प.स सदस्य चंद्रकांत घाटे,टि.पी वाघमारे, इंजी.जे.के.जोंधळे प्रा.नागेश कांबळे,प्रा.संजय कांबळे.पत्रकार सुधांशू कांबळे,पि.के गायकवाड,
अँड संजय भारदे, रघुनाथ जोंधळे मोटरगेकर,चेअरमन विकास नाईक, विठ्ठलराव जामखेडकर,गुलाबराव नाईक, माजी सरपंच एकनाथराव नाईक, माजी सरपंच खंडेराव भाटापुरकर,रामराव आचेगावे,माजी सरपंच पांडुरंग कंधारे,राम महाराज चोंडीकर, भाजपा तालुका युवा सरचिटणीस मुजाहिदीन चोंडीकर, धम्मानंद जोंधळे मोटरगेकर,माजी सरपंच यशवंत खरात,सरपंच मारोती नाईक यांच्या सह पंचक्रोशीतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.