हदगांव, शे चांदपाशा| शासनाने धूम्रपान व सार्वजनिक थुकण्यास कायद्याने बंदी घातलेली असतांना हदगाव शहरासह तालुक्यात सार्वजनिक ठिकाणी कायद्याच सर्रास उल्लंघन होताना दिसुन येत आहे. या बाबतीत अन्न व औषध व आरोग्य विभाग माञ गाढ झोपेत आसल्याने ती आपली जबाबदारी नाही असे प्रशासकीय स्तारावरुन दिसुन येत आहे.
शहरातील तालुक्यातील प्रशासकीय कार्यालय व सार्वजनिक ठिकाण या कायद्यच सर्रास उल्लंघन होत आहे शहरात व परिसरात पान टपरी हाँटेल जवळ तर गुटख्याच्या पिचका-या व बिडी सिगारेटचे टुकडे पाहायावास मिळतात या मुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होत आहे. राज्य सरकारने या बाबतीत 2008च्या दरम्यान कायदा आणलेलं आहे. परंतु त्याची प्रशासकीयस्तारावर काही प्रमाणात कागदोपञी अमलबजावणी होत आहे. शहरात व परिसरात खुले-आम बिडी सिगारेट व तबाखु सेवन करतांना दिसुन येतात. यामुळे आजुबाजुला वावरणा-या नागरिकांना याचा ञास होत आहे. विशेष म्हणजे जिल्ह्याच्या व तालुकास्तारावच्या प्रशासन यंञणेने जाणूनबुजून दुर्लक्ष केल्या मुळे या कायद्याच धाक राहीलेल दिसुन येत नाही.
तबाखू, गुटखा मुळे कर्करोगचे रुग्ण... तबाखू मुळे कर्करोग होत आसल्याचा असा वैधकीय अहवाल आहे. शहरासह तालुक्यात गुटखा व खर्रा तंबाखू मिश्रित पदार्थाचे सेवन मोठ्या प्रमाणात दिसून येते. यामध्ये आता शाळकरी विद्यार्थी व महाविद्यालयीन युवक सुध्दा गुरफटल्या जात आहे. मोठ्या प्रमाण सेवन होत असल्याने अनेकांना भुक न लागणे अतिसार तोडाचे आजार बाळवत असल्याचे अनेक रुग्ण दिसुन येतात. विशेष म्हणजे गुटखा व खर्राची दुकाने 100 मिटर परिसरात असु नये असे संकेत असले तरी तंबाखूजन्य पदार्थाचे दुकाने खुलेआम सुरु आहेत या बाबतीत संबंधित प्रशासनाने या बाबतीत जागरुक होणे अगत्याचे असुन, अशी मागणी नागरिकाकडुन होत आहे.