उस्माननगर, माणिक भिसे | आजच्या वेगवान तंत्रज्ञानाच्या वाढत्या स्पर्धेत माध्यमातही बदल स्विकारत असतानाच पत्रकारांनी अपडेट राहून निर्भीड व जागरूक पत्रकारिता साठी सज्ज असले पाहिजे. " असे मत स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील मराठी भाषा संकुलाचे प्रा. डॉ. पी. विठ्ठल यांनी उस्माननगर येथील आचार्य बाळशास्त्री जांभेकर पत्रकार सभागृहात बोलताना सोमवारी दि. २२ रोजी मत व्यक्त केले. यावेळी प्रा. वैजनाथ अनमुलवाड, सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री.पि. भारती उपस्थित होते.
पी. विठ्ठल यांनी " अभ्यासपूर्ण पत्रकारीतेची आज नितांत आवश्यकता असल्याचे सांगतानाच उस्माननगर येथील पत्रकार सभागृह निश्चित कौतुकास्पद आहे. यासाठी शक्य ते भरीव सहकार्य करणार असे सांगितले. यावेळी प्रा. अनगुलवाड यांनी सर्वसामान्यांचा आवाज मांडणारे लिखाण पत्रकार बांधवांनी करत असताना लोप पावत चाललेली कृषी संस्कृती आणि कौशल्ये टिकवण्यासाठी काम करण्याची गरज व्यक्त केली.
यावेळी पत्रकार संघाचे अध्यक्ष गणेश लोखंडे यांनी पत्रकार सभागृह विषयी माहिती दिली. उपाध्यक्ष माणिक भिसे, लक्ष्मण कांबळे, लक्ष्मण भिसे, सुर्यकांत मालीपाटील ,यांनी उपस्थित साहित्यिकांचा पुष्पहार देवून सत्कार केला. यावेळी मा.उपसरपंच देवराव सोनसळे,आकाश भिसे, प्रा. विजय भिसे, डॉ.माधव मोरे,प्रा.ॲड.नागन भिसे ,छत्रपती भिसे ,लक्ष्मण भिसे, परसराम भिसे,आदींची उपस्थिती होती. सर्व उपस्थितांचे पत्रकार सुर्यकांत मालीपाटील यांनी आपल्या विचारातून आभार मानले.
