अण्णाभाऊ साठे चौकातून गाडी चोरीला -NNL


नांदेड|
नांदेड शहरातील अण्णाभाऊ साठे चौक येथील अंबिका विद्यालय समोरून कर्मचार्‍यांची गाडी चोरीला गेल्याचा प्रकार घडला आहे.

नांदेड येथील अण्णाभाऊ साठे चौक दत्तनगर परिसरातील अंबिका विद्यालय येथील सेवक मारोती गोपाळराव नागराळे यांनी रोजच्याप्रमाणे नित्यनियमाप्रमाणे शाळेवर आल्यावर आल्यावर दि.28 जुलै 2022 रोजी दुपारी 12.00 वाजता गाडी सोडली असता सायंकाळी शाळा सुटल्यावर घरी जाण्यासाठी गाडी क्र.एमएच26 बीटी 4679 ग्रे कलरची अ‍ॅक्टीव्हा 5जी जाग्यावर न दिसल्याने गाडी चोरीला गेल्याचे निदर्शनास आल्यावर त्यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात सदरील प्रकरणी तक्रार दिली आहे.

शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुरनं.0287 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ. केंद्रे हे करीत आहेत. या ही गाडी कोणास आढळून आल्यास मारोती नागराळे मो.नं. 9422549590 यावर संपर्क करण्याचे आवाहन केले आहे.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी