उस्माननगर येथे माजी आमदार विनायक मेटे यांना भावपूर्ण श्रद्धांजली

मराठवाड्याने एक कुशल प्रशासक व मार्गदर्शक गमावला - बा.रा.वाघमारे


उस्माननगर, माणिक भिसे|
मराठवाड्यातील बीड जिल्ह्यातील भूमिपुत्र, शिवसंग्राम पक्षाचे अध्यक्ष माजी आमदार तथा उस्माननगर ( मोठी लाठी) ता.कंधार येथील जावई विनायक मेटे यांच्या अपघाती निधनाची धक्कादायक व दु:ख  घटना घडल्याची बातमी कळताच उस्माननगरवर शोककळा पसरली . 

याप्रसंगी  अण्णाभाऊ साठे पीपल्स फोर्स संघटनेचे संस्थापक बा.रा.वाघमारे बोलताना  म्हणाले की, विनायक मेटे यांनी सामाजिक बांधिलकीला तडा जाऊ दिला नाही ,त्यांच्या निधनाने मराठवाड्याने एक कुशल प्रशासक व मार्गदर्शक गमावला आहे असे भावपूर्ण उद्गागार यावेळी बोलताना  शोकसभेत आदरांजली वाहताना व्यक्त केले.

उस्माननगर विभाग ग्रामीण मराठी पत्रकार संघाच्या वतीने आचार्य बाळशास्त्री जांभेकर पत्रकार सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या शोकबैठकीत भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.यावेळी  तंटामुक्त समितीचे अध्यक्ष आनंदराव पाटील लाटकर, ( सासरे ) नितीन पाटील लाटकर ( मेव्हणे ) यांच्या सह अध्यक्ष विठ्ठल ताटे पाटील, प्रदीप देशमुख, माणिक भिसे, गणेश लोखंडे, लक्ष्मण कांबळे, धम्माजी गुंडीले ,यांची उपस्थिती होती.

अण्णाभाऊ साठे पीपल्स फोर्स संघटनेचे संस्थापक अध्यक्ष बा.रा. वाघमारे , तसेच साहित्यसम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विचार मित्र मंडळाच्या वतीने छोट्या खाणे आयोजित केलेल्या शोकसभेत माजी आमदार तथा शिवसंग्राम पक्षाचे संस्थापक अध्यक्ष विनायक जी मेटे यांच्या अकाली निधनाबद्दल शोक व्यक्त केला व आदरांजली वाहण्यात आली यावेळी अण्णाभाऊ साठे विचार मित्रमंडळाचे सर्व समाज बांधव उपस्थित होते. गावातील विविध संघटनेच्या वतीने शिवसंग्राम पक्षाचे संस्थापक अध्यक्ष व माजी आमदार विनायक मेटे यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.

आक्रमक मराठा चेहरा, शिवसंग्राम पक्षाचे संस्थापक आमदार विनायक जी मेटे यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी तळमळीने समाजातील वंचित घटकासाठी सातत्याने अनेक वर्ष आंदोलनाच्या माध्यमातून संघर्ष व योगदान दिले होते. त्यांच्या जाण्याने मोठे नुकसान झाले आहे.  विनायक मेटे यांच्या निधनाने मराठवाड्याने एक कुशल प्रशासक व मार्गदर्शक गमावला असून , त्यांच्या अकाली निधनाने जी पोकळी निर्माण झाली ती पोकळी भरून निघणे शक्य नाही.असे अनेक मान्यवरांनी शोक व्यक्त केला.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी