मराठा समाजाच्या विविध प्रश्नांसाठी सदैव वाचा फोडणारे मेटे होते- संभाजी ब्रिगेड -NNL


नांदेड|
मराठा समाजासाठी सदैव झगडणारे शिवसंग्राम चे संस्थापक अध्यक्ष माजी आमदार विनायक मेटे यांच्या अपघाती दुःखद निधन झाल्यामुळे संभाजी ब्रिगेड च्या वतीने विनायक मेटे यांना भावपूर्ण आदरांजली वाहिली.

मराठा समाजाचा आरक्षणाचा प्रश्न, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ कर्ज मंजुरी प्रश्न,अरबी समुद्रात छ शिवाजी महाराजांचे स्मारक उभारण्यासाठीचा पुढाकार असो अशा विविध प्रश्नांवर वेळोवेळी वाचा फोडणारे असे विनायक मेटे होते त्यांच्या अशा अचानक निधनाने समाजाची प्रचंड हानी झाली असुन ही हानी कधीही भरुन न निघणारी आहे सरकारने ठेवलेल्या मराठा आरक्षण प्रसंगी मुंबई येथील बैठकीस जाण्यासाठी ते प्रवास करत होते त्या प्रवासात त्यांचा अपघाती मृत्यु झाला आहे.

त्यामुळे शासनाने काही दिवसांत मराठा समाजाचा ओबिसीत समावेश करूनच मेटेंना आदरांजली व्हावी तो पर्यंत पोकळ आदरांजली वाहण्याचा त्यांना अधिकार नाही असे मत या शोकसभा प्रसंगी संभाजी ब्रिगेड लोकसभा अध्यक्ष संकेत पाटील यांनी मत व्यक्त केले.यावेळी संभाजी ब्रिगेड लोकसभा अध्यक्ष संकेत पाटील,दिपक भरकड, ज्ञानेश्वर शिंदे, भुजंग जाधव, गजानन शिंदे, मयुर अमिलकंठवार,राम मोरे,अनिल शिंदे,शैलेश मुंडकर यांच्या सह इतरांची उपस्थिती होती.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी