नांदेड| स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या मुख्य प्रशासकीय इमारतीसमोरील प्रांगणामध्ये आजादी का अमृत महोत्सवामधील स्वातंत्र्य दिनानिमित्ताने विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.उद्धव भोसले यांच्या हस्ते ध्वजारोहण करून स्वातंत्र्यदिन उत्सहात साजरा करण्यात आला.
यावेळी विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ.जोगेंद्रसिंह बिसेन, कुलसचिव डॉ.सर्जेराव शिंदे, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. दिगंबर नेटके, विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. एल.एम.वाघमारे, आंतरविद्याशाखेच्या अधिष्ठाता डॉ. वैजंयता पाटील, मानव्यविद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. अजय टेंगसे, नवोपक्रम, नवसंशोधन आणि साहचर्य मंडळाचे संचालक डॉ. राजाराम माने, प्र-वित्त व लेखाधिकारी डॉ. गोविंद कतलाकुटे, क्रीडा व शारीरिक शिक्षण विभागाचे संचालक डॉ. विठ्ठलसिंह परिहार, विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. सूर्यप्रकाश जाधव, राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे संचालक डॉ. मलीकार्जुन करजगी यांची प्रमुख उपस्थिती होती.
विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. उद्धव भोसले यांनी उपस्थितांना भारताच्या ७५ व्या स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या. यावेळी विद्यापीठाचे व्यवस्थापन परिषद सदस्य, अधिसभा सदस्य, संचालक, प्राध्यापक, अधिकारी, कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.