अर्धापूर, निळकंठ मदने। शेतकऱ्यांनी आता काळानुसार पध्दतीत बदल करुन,हवामान पाहून कमी किंवा जास्त पाण्याची पीके घ्यावीत, त्यामुळे शेतकऱ्यांना निश्चित यश मिळेल असे प्रतिपादन प्रसिद्ध हवामान तज्ञ पंजाबराव डक यांनी शेतकरी शिबीराला मार्गदर्शन करतांना केले.
नांदला दिग्रसचे युवकचे कार्यकर्ते दिगांबर तिडके पाटील यांनी डॉ शंकरराव चव्हाण जयंती निमित्त १० व्या वर्षी वेगवेगळे उपक्रम राबवितात, यामध्ये शालेय साहित्य वाटप, किर्तन तर यावर्षी गुरुवारी परभणीचे प्रसिद्ध हवामान तज्ञ पंजाबराव डक यांचे शेतकऱ्यांना हवामान विषयक शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कार्यक्रमाचे उद्घाटक जिल्हाध्यक्ष गोविंदराव शिंदे नागेलीकर,तर कार्यक्रमाचे अध्यक्ष सरचिटणीस संजय देशमुख लहानकर, प्रमुख पाहुणे तालुकाध्यक्ष बालाजी पाटील गव्हाणे, उपसरपंच भगवान तिडके, संचालकआनंद सावते,सचिव निळकंठराव मदने,संचालक संजय लोणे, उपसरपंच मारोतराव तिडके यांची उपस्थिती होती.
यावेळी डॉ शंकरराव चव्हाण यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.पाहुण्यांचे संयोजक दिगंबर तिडके पाटील यांनी शाल,हार, सन्मानचिन्ह देऊन स्वागत केले,याप्रसंगी पंजाबराव डक म्हणाले कि, हवामानाचा अचूक अंदाज घेऊनच शेतकऱ्यांनी शेतातील पेरणी,लागवडसह काढणीपर्यतची कामे करावीत, काळ्या जमीनीवर गारपीट सहसा होत नसून, खडकाळ जमीनीवर गारपीट होत असते,वीजेपासून शेतकऱ्यांनी व कामगारांनी संरक्षण कसे करायचे त्या उपाययोजना सांगीतल्या, दरवर्षी पावसाळ्याचा अंदाज घेऊनच आवश्यक ती पीके घ्यावीत, तब्बल दोन तास शेतकऱ्यांना हवी हवीशी वाटणारी व पटणारी माहिती त्यांनी यावेळी दिली.
गेल्या सप्ताहात सुर्यदर्शन झाले नसूनही त्यांनी उघड्यावर कार्यक्रम घेण्याचे संयोजकाला सांगीतले,व पाऊस या सप्ताहात पहिल्यांदा उघडला डक पाटील यांचा अंदाज खरा ठरला, यावेळी मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांनी गर्दी केली होती.कार्यक्रमाचे सुत्रसंचलन राजू कदम प्रस्तावित दिगंबर तिडके व आभार बालाजी तिडके यांनी मानलें.यावेळी मुंजाजी तिडके,राजाराम पवार,शंकर ढगे संजय गोवंदे,अशोक तिडके, रमेश सरपाते, शिवाजी तिडके, दिनेश क्षीरसागर,सिरपतराव क्षीरसागर, नामदेव पाटील,अजय सरपाते,दता तिडके,शिंदे,चांदू तिडके या़च्यासह आदिंची उपस्थिती होती.