सेवापूर्ती निमित्त सिद्धार्थ पाटील यांचा सत्कार -NNL


नांदेड|
मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटनचे केंद्रीय उपाध्यक्ष व सहाय्यक अभियंता सिद्धार्थ पाटील हे 34 वर्षांच्या प्रदिर्घ सेवेनंतर सेवानिवृत्त झाले आहेत. एका समारंभात सिद्धार्थ पाटील यांचा सेवापूर्तीनिमित्त सत्कार करण्यात आला.

गेल्या तीन दशकापासून मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटन मध्ये कार्यरत असलेले सहाय्यक अभियंता सिद्धार्थ पाटील हे 34 वर्षाच्या प्रदिर्घ सेवेनंतर नुकतेच सेवानिवृत्त झाले आहेत. त्यांच्या सेवापूर्तीनिमित्त मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटनेच्यावतीने सत्कार सोहळा व कामगार मेळावा नमस्कार चौकातील हॉटेल गणराज येथे आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष डॉ.संजय खोडके, केंद्रीय कार्याध्यक्ष एस.के.हनवते, केंद्रीय संघटक वाय.के.कांबळे, केंद्रीय उपाध्यक्ष नवनाथ पोटभरे, केंद्रीय उपसरचिटणीस संजय मोरे, प्रसिध्दी प्रमुख बंडू शंभरकर आदी मान्यंवर उपस्थित होते.

सेवापूर्तीनिमित्त सिध्दार्थ पाटील यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला. व त्यांच्या पुढील आयुष्य सुखसमृद्धीचे व आरोग्यदायी जाण्याच्या शुभेच्छा उपस्थित मान्यंवरांनी आपल्या मनोगतात दिल्या. या कार्यक्रमाला औरंगाबाद पारेषण परिमंडळातील तसेच नांदेड परिमंडळातील नांदेड, हिंगोली, परभणी येथील सर्व विभागात कार्यरत संघटनेचे पदाधिकारी व सभासद उपस्थित होते.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी