नांदेड| महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण संचालनालयाच्या वतीने नांदेड येथील शासकीय तंत्रनिकेतन येथील 200 विद्यार्थ्यांना कॅम्पस ड्राईव्दारो रोजगाराची संधी प्राप्त झाली आहे. औरंगाबाद विभागाचे सहसंचालक यु. टी. नागदेवे यांच्या मार्गदर्शनात प्राचार्य एस.एम गर्जे यांच्या पुढाकाराने 2021-22 या शैक्षणिक वर्षात अस्थपना आणि प्रशिक्षण सेलच्यावतीने विद्यार्थ्यांसाठी कॅम्पस ड्राईव्हची प्रक्रिया ही ऑनलाईन आणि ऑफलाईन या दोन्ही पध्दतीने राबविण्यात आली होती.यामुळे अनेक होतकरु विद्यार्थ्यांना रोजगाराची संधी उपलब्ध झाली.
बजाज ऑटो यंत्र विभागचे 64,विद्युत विभागाचे 15, आणि उत्पादन विभागाचे 15 तर एल अण्ड टी कंपनी सिव्हिल विभागाचे 1 इलेक्टिक विभागाचे 2, आय टी विभागाचे 1 याप्रमाणे 10 याप्रमाणे आर एस एम बायोमेडिकल या कंपनीमध्ये मेडिकल इलेक्टीक विभागचे 11 आणि त्रिनिटी कंपनी मध्ये यंत्र विभागाचे 6 विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली आहे.यंत्र विद्युत आणि अनुविद्युत प्रोडक्शन विभाग मिळून 270 प्रवेश क्षमता असून 170 विद्यार्थ्यांची निवड झाली आहे.यामध्ये 200 पेक्षा अधिक विद्यार्थ्यांची निवड झाली आहे.यापैकी अनेक विद्यार्थ्यंना प्लेसमेंट मिळाली आहे.कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी डॉ.जीव्ही.गर्जे , एस आर मुधोळकर आणि यांनी परीश्रम घेतले.