सणासुदीच्या काळात नांदेडमध्ये स्थागुशाने जप्त केली ३८ हजाराची देशी-विदेशी दारू -NNL


नांदेड|
राज्यभर सण -उत्सव हर्षोल्हासात साजरा केला जात असतांना यामध्ये अडचण निर्माण होणार नाही यासाठी पोलीस तत्पर आहेत. मात्र यातही काही जण अवैध दारु विक्री करून वातावरणात अशांतता पसरविण्याचा प्रयत्न करावीत आहेत. अश्याच एका दारू विक्रेत्याला स्थानिक गुन्हा शाखेने पकडून त्याच्याकडून ३८  हजार १०० रुपये किंमतीची देशी व विदेशी दारु पकडली आहे.

महाराष्ट्रासह नांदेड जिल्ह्यात दोन वर्षांनंतर धुमधडाक्यात आषाढी महोत्सव आणि ईद उल अजहा हे धार्मिक सण साजरे केले जात आहेत. त्यामुळे प्रशासनाने सर्वत्र लक्ष केंद्रित करून शांतता भंग होणार नाही याची काळजी घेतली आहे. स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरिक्षक द्वारकादास चिखलीकर यांच्या मार्गदर्शनात विशेष पथक गस्त करत असतांना शहरातील अण्णाभाऊ साठे चौकात साहेबराव गंगाराम बसवंते या व्यक्तीकडे तपासणी केली.

तपासणीत त्याच्याकडून भिंगरी नावाच्या देशी दारुचे काही बॉक्स आणि मॅग्डॉल नंबर वन नावाच्या विदेशी दारुचे बॉक्स सापडले. या सर्वांची किंमत ३८ हजार १०० रुपये आहे. हि कार्यवाही पोलीस निरीक्षक द्वारकादास चिखलीकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरिक्षक पांडूरंग भारती, पोलीस अंमलदार बजरंग बोडके, मोतीराम पवार, देविदास चव्हाण, तानाजी येळगे, हेमंत बिचकेवार यांनी केली आहे.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी