उस्माननगर, माणिक भिसे| उस्माननगर परिसरात व येथे मागील दोन तीन दिवसांपासून पडत असलेल्या संततधार पावसामुळे जनजीवन विस्कळित झाले असून नागरीक अडगळीत टाकलेल्या फाटलेल्या व काड्य मोडलेल्या छत्र्यांची दुरुस्ती साठी दुकानात गर्दी होत आहे.
उस्माननगर परिसरात सुरुवातीपासून म्हणजेच रोहीणी नक्षत्र कोरडे जरी गेले असले तरी मृग नक्षत्रात झालेल्या दमदार पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांनी पेरणीची लगबग करून निसर्गाच्या भरवशावर पेरणी करून घेतली.मृग नक्षत्रात कुठे मोठा तर कुठे झिम झिम पाऊस पडत असताना शेतकरी हैराण झाला होता.आकाशात ढग जमा झाले की किती मोठा पाऊस पडतो की, म्हणून आनंदात राहायचे,हवा आली की ढग पुढे जायचे आशा खेळीमेळीच्या वातावरणात निसर्गाने मागील दोन तीन दिवसांपासून पडत असलेल्या संततधार पावसामुळे जनजीवन विस्कळित झाले आहे.
पिकाची वाढ समाधानकारक असल्याने शेतकरी खुश दिसत आहेत.उस्माननगर शिवारात शेतकऱ्यांनी यंदा मोठ्या प्रमाणात कापूस,हाळद , सोयाबीन ,व अंतर पिक म्हणून तूर ,मुग , उडीद ,तिळ मका ,तर मोजक्याच शिवारात ज्वारी घेतली आहे. यावर्षी हाळद व सोयाबीनला चांगला भाव मिळाल्याने या भागातील शेतकऱ्यांनी यंदा मोठ्या प्रमाणात पसंती दिली आहे.
मागील दोन तीन दिवसांपासून पडत असलेल्या संततधार पावसामुळे नागरिकांनी अडचणीत टाकलेल्या छत्र्या बाहेर काढून पावसात नेताना उंदराने कतरल्याचे आढळून आल्याने येथील पांडूरंग सोनटक्के हे बऱ्याच वर्षापासून छत्र्या दुरुस्त करतात.नागरिक नविन छत्रीची किमंत विचारुन जून्याच छत्रीला नवीन करुन घेण्यासाठी गर्दी होत आहे. यावर्षी किमती वाढल्या मुळे कोन्ही नवीन छत्रीकडे धजत नाहीत. जुन्याच छत्रीला फाटलेली ,काड्या बसून पावसा पासून बचाव करण्यासाठी शिऊन घेताना दुकानावर गर्दी होत आहे.