लोहा। लोहा तालुक्यातील दिव्यांग प्रमाण पत्रासाठी नाव नोंदणी केलेल्या इच्छुक नागरिकांच्या आरोग्य तपासणी साठी तालुक्यात दिव्यांगासाठी आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. सर्कलनिहाय नोंदणी केलेल्या दिव्यांगांनी ग्रामीण रुग्णालयात उपस्थिती राहावे व लाभ घ्यावा असे आवाहन तहसीलदार व्यंकटेश मुंडे यांनी केले आहे.
लोहा तालुक्यातील दिव्यांग प्रमाणपत्र मिळावे यासाठी दिव्यांगांनी नोंदणी केली त्याची आरोग्य तपासणी वरिष्ठ डॉक्टरांच्या कडून करण्यात येणार आहे. सर्कल निहाय नोंदणी केलेल्या दिव्यांगाची लोह्याच्या ग्रामीण रुग्णालयात तपासणी होणार आहे. त्यासाठी तालुका आरोग्य अधिकारी डॉ संतोष गुंजलवार यांनी सर्कल निहाय नियोजन केले आहे. 8 जुलै रोजी सोनखेड वडेपुरी, 15 जुलै उमरा 22 जुलै रोजी कलंबर तर 29 जुलै रोजी सावर,गाव नसरत माळाकोळी या गटातील ज्या दिव्यांगांनी नोंदणी केलेली आहे त्याची आरोग्य तपासणी होणार आहे.
त्यासाठी आपल्या गटातील गावातल्या नोंदणीकृत दिव्यांगांनी सकाळी आठ वाजता लोह्याच्या ग्रामीण रुग्णालयात उपस्थित राहावे सोबत आधार कार्ड, राशन कार्ड व दोन फोटो सोबत आणावेत. उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक डॉ अब्दुल बारी यांनी नाव नोंदणी केलेल्या दिव्यांगाची आरोग्य तपासणी ८जुलै पासून करण्यात येणार आहे असे सांगितले. सर्कल निहाय गावागावात ज्यानी नाव नोंदणी केली आहे. अशांना ग्रामसेवकांच्या मार्फत निरोप देण्यात आले आहे. बीडीओ शैलेश वाव्हूळे यांनी संबंधितांना काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याचे व कोणीही विसरून राहू नये या बाबत सूचना दिल्या आहेत. तालुक्यातील दिव्यांगांची आरोग्य तपासणी व त्यानंतर तेथेच दिव्यांग प्रमाणपत्र वितरण करण्यासाठी घेण्यात येणाऱ्या शिबिराचा संबंधितांनी लाभ घ्यावा असे आवाहन तहसीलदार व्यंकटेश मुंडे यांनी केले आहे