माजी सैनिकांसह,अनेकांनी वाहिली श्रद्धांजली
लोहा| तालुक्यातील पारडी येथील माजी सैनिक व्यंकटराव आप्पाराव पाटील गायकवाड यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने दिनांक २३जुलै २०२२ रोजी रात्री दीड वाजता वयाच्या ५६ व्या वर्षी निधन झाले. त्यांनी १९८५ पासून केंद्रीय रिझर्व पोलीस बल मध्ये दाखल होवून जिवाची पर्वा न करता देशातील विविध भागात सेवा केली होती.
देशसेवा करून ३१डिसेंबर २००६ ला सेवानिवृत्त झाल्यावर गावांसह तालुक्यात विविध सामाजिक प्रश्न हाताळत त्यांनी नावलौकिक मिळविला होता. त्यांच्या पश्चात पत्नी,एक मुलगा,एक मुलगी,सुन,नातवंडे असून युवा उद्योजक सुनिल पाटील गायकवाड यांचे ते वडील होत. तर भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाा सरचिटणीस सूर्यकांत गायकवाड यांचे चुलत भाऊ होत.
माजी सैनिक स्व.व्यंकटराव गायकवाड यांच्या पार्थिवदेहावर दि.२४जुलै २०२२ रोजी सायंकाळी साडेसात वाजता पारडी येथे त्यांना सामाजिक,शैक्षणिक,राजकीय विविध क्षेत्रातील पदाधिकाऱ्यांसह सैनिक,ग्रामस्थांसह पंचक्रोशीतील नागरिकांच्या उपस्थितीत शोकाकूल वातावरणात मानवंदना देवून पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली वाहिली व अंत्यसंस्कार करण्यात आले.माजी सैनिक स्व.व्यंकटी आपाराव गायकवाड यांचे अंत्यविधी साठी सीआरपीएफ CTC mudhked कॅम्प चे निरीक्षक शिवाजी मुलगिर,चार मुख्य आरक्षक आणि चार अारक्षक असे 9 जवान ची टीम सलामी देण्यासाठी दाखल झाली होती.
नांदेड जिल्हा पेरामिलिट्री चे जिल्हा अध्यक्ष सुनिल लोने, माजी सैनिक संघटना जिल्हाध्यक्ष बालाजी चुकलवाड, जिल्हा मीडिया प्रभारी जनार्दन शेजुळे,लोहा तालुकाध्यक्ष मदन काळे,उपाध्यक्ष बी.व्ही.सोनवळे , सदस्य नवनाथ महाजन, पी डी हंबर्डे, संग्राम जायभाये, बालाजी जोगदंड, अंबादास कांबळे, गणेश मिलट्री कैम्पचे संचालक उद्धव डिकळे, आमचे विद्यार्थी,पार्डी चे माजी सैनिक व्यंकटराव पवार, संजय गायकवाड, माजी जि.प.सदस्या प्रणिताताई चिखलीकर, माजी पं.स. सभापती सतीश उमरेकर,माजी उपनगराध्यक्ष शरद पाटील पवार, सरपंच राम पवार, उपसरपंच प्र.शरद पवार,माजी सरपंच दिगांबर पाटील डिकळे, पंचक्रोशीतील नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
अग्नी दिला अन् धोधो पाऊस, प्रशासन आता तरी कायमस्वरूपी अंत्यविधीला जागा देईल का? स्मशान भूमी पारडीला मिळेल का? गेली कित्येक दिवसांपासून केवळ प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे पारडी येथे स्मशानभूमी उपलब्ध नसून रस्त्यावरच अथवा तलावाच्या पाळूवर अंत्यविधी केला जातो. याचा प्रत्यय आज हजारो पंचक्रोशीतील लोकांनी घेतला. निसर्गाचं रौद्र रूप अन् तात्पुरते पत्राचे सेड आणि त्यात चिताग्नी अतिशय विदारक चित्रण दिसून आले.