दारू पिऊन धिंगाणा करण्याच्या कारणावरून गोधन तांडा येथे खुनाचा प्रयत्न -NNL


हिमायतनगर|
तालुक्यातील मौजे गोधन तांडा येथे दारू पिऊन धिंगाणा का करतोस या कारणावरून खुनाचा प्रयत्न तोंडावर चटणी टाकुन लाकडाने तोंडावर डोळयात मारुन खून करण्याचा पर्यटन झाल्याची घटना दि.८ रोजी ५ वाजेच्या सुमारास घडली आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे कि हिमायतनगर तालुक्यातील मौजे गोधन तांडा येथे दि.०८ रोजी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास दोन आरोपीतांनी संगणमत करुन फिर्यादीचा चुलता एकनाथ चंदु आडे यास घरात दररोज दारु पिऊन धिंगाना का करतोस या कारणावरुन घराचे वसरीत खाली पाडून तोंडावर चटणी टाकुन लाकडाने तोंडावर डोळयात मारुन गंभीर दुखापत केली. एव्हडेच नाहीतर आरोपीतांनी एकनाथ आडे यांचा खुन करण्याचा प्रयत्न केला.

अशी फिर्याद जयसिंग प्रकाश आडे, वय २८ वर्षे, व्यवसाय शेती रा. गोधन तांडा खैरगाव ता. हिमायतनगर जि. नांदेड यांनी दिल्यावरुन हिमायतनगर पोलीस ठाण्यात गुरन १६६/२०२२ कलम ३०७,३४ भादवि कायदा प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा अधिक तपास पोलीस निरीक्षक भुसावर यांचे मार्गदर्शनाखाली सपोनि. बालाजी महाजन हे करीत आहेत. 


 

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी