पंडित दिनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा संपन्न; मेळाव्यात 191 उमेदवारांची प्राथमिक निवड -NNL


नांदेड|
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र व श्री हजुर साहिब औद्योगिक प्रशिक्षण संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने श्री हजुर साहिब औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत सुशिक्षित बेरोजगार उमेदवारांसाठी पंडीत दिनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा नुकताच संपन्न झाला. या मेळाव्यात 9 नामांकित कंपन्यानी सहभाग नोंदवला. या मेळाव्यात एकूण 310 उमेदवार उपस्थित होते. नऊ कंपन्यांनी उमेदवारांची मुलाखती घेऊन 191 विद्यार्थ्यांची प्राथमिक निवड केली. 

या मेळाव्यास श्री गुरुद्वारा सचखंड बोर्डाचे अधिक्षक श्री गुरुविंदरसिंग वाधवा, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य बिराजदार, भोकर औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य श्री पाटणुरकर, गुरुद्दारा सचंखड बोर्डाचे सहायक अधीक्षक रवींद्रसिंग कपुर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन केंद्राच्या अध्यक्षा श्रीमती सुजाता पोहरे, सहायक आयुक्त श्रीमती रेणुका तम्मलवार, प्राचार्य गुरबचन सिंग शिलेदार यांची उपस्थिती होती. 

या कार्यक्रमाचे अध्यक्ष गुरुविंदरसिंग वाधवा यांनी युवकांना स्वत:चे कौशल्य ओळखून जीवनातील समस्यांना कशाप्रकारे सामोरे गेले पाहिजे याविषयी मार्गदर्शन करुन विद्यार्थ्यांना मुलाखतीसाठी शुभेच्छा दिल्या. प्राचार्य बिराजदार यांनी विद्यार्थ्यांना कामाशिवाय या जगात कुणीही महत्व देत नाही या विषयावर मार्गदर्शन केले. श्री पाटणुरकर यांनी मराठवाडयातील मुलांची मानसिकता कशी असते व त्यांना या स्पर्धेच्या जगात स्वत:ला सिध्द केले पाहिजे असे सांगितले. सहायक आयुक्त श्रीमती रेणुका तम्मलवार यांनी विद्यार्थ्यांना मुलाखतीच्या वेळी वर्तन कसे असावे याबाबत मार्गदर्शन करुन मार्गदर्शन केंद्रातील योजनांची माहिती दिली. श्रीमती सुजाता पोहरे यांनी विद्यार्थ्यांना आपले कर्तृत्व कसे सिध्द करावे याबाबत मार्गदर्शन केले. 

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी