कौतुकाची थाप..... शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा.....!
उस्माननगर, माणिक भिसे| दि.१७ जून शुक्रवारी दुपारी महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे यांच्या वतीने घेण्यात आलेल्या इयत्ता दहावीचा निकाल लागला असून उस्माननगर ( मोठी लाठ) ता.कंधार येथील समता विद्यालयाचा ९६.९६ टक्के निकाल लागला.असून शाळेतील गुणवंत विद्यार्थ्यांच्या पाटीवर कौतुकाची थाप देऊन गावच्या व शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवल्या बध्दल विद्यार्थ्यांचा सत्कार शाळेच्या वतीने करण्यात आला.
लातूर शिक्षण मंडळाच्या वतीने इयत्ता दहावी परिक्षेचा ऑनलाईन पद्धतीने निकाल जाहीर झाला.समता विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनीनी यशाची परंपरा कायम राखत शाळेचे नेत्रदीपक यश संपादन केले.७२ विद्यार्थी विशेष प्राविण्य मिळवले , तर २२ विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत.तीन विद्यार्थी व्दितीय श्रेणीत उत्तीर्ण झाले आहे.
शाळेचा ९६.९६ टक्के निकाल लागल्याने शाळेचे मुख्याध्यापक गोविंद बोदेमवाड यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेतील सहशिक्षिक यांनी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार केला. यावेळी पर्यवेक्षक राजीव अंबेकर, जी.आर.सोनवणे, बी.बी.वडजे, पी.बी.इंगळे,एस.आर.राठोड, ना.ना.लोढे,पी.व्ही.लामदाडे,बी.एन.डांगे,बी.बी.पाटील,सौ.वर्षा देशमुख, सौ.गौतमी कुलकर्णी,श्रीमती ज्योती गुंटूरकर यांच्यासह सर्व शिक्षकवृंद कर्मचारी यांची उपस्थिती होती.