मुनगंटीवार कुटुंबीयांचे खा.चिखलीकरांकडून सांत्वन - NNL


नांदेड।
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी विभाग संघचालक तथा चंद्रपूर शहरातील प्रसिद्ध डॉक्टर सच्चिदानंद सांबशिव मुनगंटीवार यांचे वृद्धापकाळाने निधन झाल्याने नांदेड लोकसभा मतदार संघाचे भाजपा खा.प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी राज्याचे माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या निवासस्थानी भेट देऊन मुनगंटीवार कुटुंबीयांचे सांत्वन केले. डॉ.सच्चिदानंद मुनगंटीवार हे माजी मंत्री सुधीरभाऊ मुनगंटीवार यांचे वडील होत.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे विभाग संघचालक, लोकमान्य टिळक स्मारक मंडळाचे अध्यक्ष, चिन्मय मिशनचे अध्यक्ष, डॉ.हेडगेवार जन्मशताब्दी सेवा समितीचे अध्यक्ष अशा विविध व महत्त्वाच्या जबाबदाऱ्या डॉ.सच्चिदानंद शिवसांब मुनगंटीवार यांनी समर्थपणे सांभाळल्या. सन 1967 मध्ये त्यांनी भारतीय जनसंघाकडून चंद्रपूर विधानसभेचे निवडणूक लढविली होती. 


त्यांचे वृद्धापकाळाने नुकतेच निधन झाल्याचे वृत्त कळताच खा.प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी त्यांच्या निवासस्थानी भेट देऊन त्यांचे सुपुत्र विधिमंडळ लोकलेखा समितीचे प्रमुख तथा माजी अर्थमंत्री सुधीरभाऊ मुनगंटीवार व त्यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले. यावेळी भारतीय जनता पार्टीचे प्रदेश कार्यकारणी सदस्य बालाजी बच्चेवार, भारतीय जनता पार्टीचे जिल्हा सरचिटणीस श्रावण पाटील भिलवंडे यांची उपस्थिती होती.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी