पोलिसांनी स्वसंरक्षणार्थ गोळी झाडली; फरार आरोपी जखमी -NNL


लातूर। 
दोन खुन करुन पोलिसांच्या कोठडीतून पळून जाऊन फरार झालेल्या गुन्हेगारास लताूर येथील त्याच्या भाड्याच्या घरात पकडण्यासाठी गेलेले पोलीस निरीक्षक बालाजी मोहिते यांच्यावर खुनी आरोपीने जिवघेणा हल्ला केला़. तेंव्हा स्वसंरक्षणार्थ मोहिते यांनी केलेल्या गोळीबारात नारायण तुकाराम इरबतनवाड रा़ शिरुर अनंतपाळ हा जखमी झाला आहे, अशी माहिती पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांनी पत्रकार परिषदेत दिली़.

चाकुर पोलीस ठाण्याच्या हद्दीत चापोली शिवारात खदाणीत नेऊन जागेच्या वादावरुन एकाचा खुन करण्यात आला होता़ या प्रकरणी संशयावरुन मुख्य सुत्रधार नारायण तुकाराम इरबतनवाड यास चाकुर पोलीसांनी ताब्यात घेतले होते़ २४ मार्च २०२२ रोजी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास पोलिसांची नजर चुकवुन तो पळून गेला होत़्ाा़ पोलीस त्याचा शोध घेत होती़.

 तो लातूर येथील श्रीनगरमध्ये भाड्याच्या घरी आल्याची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक बालाजी मोहिते तात्काळ श्रीनगरमध्ये गेले़. त्यावेळी नारायण इरबतनवाड याने मोहिते यांच्यावर झडप मारुन त्यांचा गळा आवळला व मोहिते यांचे रिव्हॉल्वर हिसकावण्याचा प्रयत्न केला़ त्यावेळी मोहिते यांनी सावधपणे स्वसंरक्षणार्थ गोळीबार केला़ त्यात नारायण इरबतनवाड जखमी झाला आहे़ जखमी आरोपीस शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे़.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी