नांदेड| स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठांतर्गत पदवी, पदव्युत्तर व व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या परीक्षा पूर्वीच्या वेळापत्रकानुसार २१ जून २०२२ पासून सुरू होणार होत्या. सदर परीक्षा सुधारित वेळापत्रकानुसार आता २८ जून २०२२ पासून सुरू होणार आहेत. या बाबतीचे विस्तृत वेळापत्रक लवकरच विद्यापीठाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येणार आहे.
विद्यार्थांच्या विनंतीवरून विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. उद्धव भोसले यांनी या परीक्षा पुढे ढकलण्याचा आदेश काढला आहे. पण विद्यापीठाच्या २ जून २०२२ पासून सुरु झालेल्या पदवी अभ्यासक्रमाच्या परीक्षा पूर्वी ठरलेल्या वेळापत्रकाप्रमाणेच सुरु राहणार आहेत. त्यामध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही.
पदवी, पदव्युत्तर व व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या परीक्षा या प्रचलित पेन अँड पेपर पद्धतीने दीर्घोत्तरी प्रश्नपत्रिकाद्वारे घेण्यात येणार आहेत. या बाबतीत प्राचार्य, परीक्षा केंद्रप्रमुख, विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी या सर्व घटकांनी सुधारित वेळापत्रकाप्रमाणे उन्हाळी-२०२२ च्या परीक्षा सुरळीत पार पाडण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे प्र-संचालक हुशारसिंग साबळे यांनी केले आहे.