नांदेड। दोन राज्यांत बंधुभाव निर्माण करत करत सांस्कृतिक देवाण-घेवाण करण्यासाठी संत नामदेव महाराज यांच्या जन्मशताब्दी वर्षाचे औचित्य साधत नानक-साई फाउंडेशनची घुमानवारी यंदा विमाना ऐवजी भारतीय रेल्वेने प्रवास करणार आहे. 2 नोव्हेंबर ते 12 नोव्हेंबर 2022 या कालावधीत हि यात्रा होणार आहे.
नानकसाई फाउंडेशनच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या घुमान यात्रेची जय्यत तयारी सुरू झाली आहे. यंदाचे संत नामदेव यांचे ७५२ वे जन्मशताब्दी वर्ष आहे. महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांतून भाविक यात सहभागी होत आहेत.संत नामदेव यांच्या विचारांचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी मागील आठ वर्षांपासून यात्रा आयोजित केली जाते. मागील वर्षी हवाई मार्गाने यात्रा घुमानला गेली होती, यावेळी नांदेड-अमृतसर विषेश एक्सप्रेस ने जाणार असल्याचे फाउंडेशनचे चेअरमन तथा ज्येष्ठ पत्रकार पंढरीनाथ बोकारे यांनी सांगितले.
धार्मिक आणि सामाजिकतेचे मिलन असलेल्या या यात्रेला यावेळी संत नामदेव महाराजांच्या जन्मशताब्दी वर्षाचा संदर्भ असल्याने घुमानवारीला वेगळे,ऐतिहासिक महत्त्व असणार आहे. पंजाब सरकार आणि घुमान च्या नामदेव दरबार कमिटीच्या वतीने उत्सवाची तयारी सुरू आहे. यात्रेच्या निमित्ताने पंजाब सह उत्तर भारतातील धार्मिक, ऐतिहासिक स्थळांना भेटी दिल्या जातात. संत नामदेव महाराज यांची कर्मभूमी 'तीर्थक्षेत्र घुमान',अमृतसर चे सुवर्णमंदिर,शक्तिपीठ 'माता नैनादेवी',शक्तीपीठ माता ज्वाला देवी (हिमाचल प्रदेश), आनंदपूर साहिब' (तख्त) -कुरुक्षेत्र, पानिपत, नवी दिल्ली,आशिया खंडातील सर्वात उंच आणि भव्य 'भाकरा नांगल' धरण-पंजाबच्या संस्कृतीचा आँखो देखा इतिहास असलेले 'विरास्ते खालसा म्युझियम',परजिया कलान- 'कार्तिकी स्वामी'-वाघा 'अटारी' बॉर्डर- 'माता दुर्गा' मंदिर अमृतसर- जालियनवाला बाग- फतेगड साहिब, बस्सी पाठणा असे भ्रमण व दर्शन घडवते.
यात्रेत सहभागी होण्याचे आवाहन नानक साई फाऊंडेशन चे चेअरमन पंढरीनाथ बोकारे (9823260073) आणि यात्रा संयोजन समितीच्या वतीने करण्यात आले आहे.