लोहा| सोनखेड येथील श्री शिवाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या उपमुख्याध्यापक पदी जेष्ठ शिक्षक वसंतराव विठ्ठलराव पवार यांना पदोन्नती देण्यात आली आहे. त्यांनी या पदाचा पदभार स्वीकारला आहे.
राज्यात स्थानिक स्वराज्य संस्था अतिसत्वात आल्या नंतर १९६२ ते १९७२ या काळात कंधार पंचायत समितीचे पाहिले व ग्रामविकासाच्या मुहूर्तमेढ रोवणारे माजी सभापती कै विठ्ठलराव पवार पाटील यांचे जेष्ठ चिरंजीव वसंतराव पवार यांना श्री शिवाजी मोफत शिक्षण संस्थेने पदोन्नती दिली आहे. सोनखेड येथील श्री शिवाजी हायस्कूल येथे त्यांना उप मुख्याध्यापक म्हणून नियुक्ती देण्यात आली.शाळेचे मुख्याध्यापक श्री पवळे यांनी त्यांचे स्वागत केले.
संस्थेचे संस्थापक भाई डॉ केशवराव धोंडगे, संस्थेचे सचिव भाई गुरूनाथराव कुरुडे, संस्थेचे अध्यक्ष प्रा पुरुषोत्तम धोंडगे, सहसचिव ऍड मुक्तेश्वर धोंडगे तसेच सार्वजनिक बांधकाम उपविभागाचे उपअभियंता मोहनराव पवार, यासह शिक्षक व कर्मचारी यांनी अभिनंदन केले. लोहा नगर पालिकेचे दहा वर्षे नगरसेवक, काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष म्हणून त्यांनी जबाबदारी सांभाळी आहे .जिजामाता शिक्षण संस्थेचे ते अध्यक्ष आहेत .त्याच्या निवडी बद्दल मित्रपरिवार यांनी अभिनंदन केले आहे