हर घर दस्तक -२ अभियान अंतर्गत भोकर शहरात कोविड लसीकरण -NNL


भोकर|
हर घर दस्तक -२ अभियान अंतर्गत भोकर शहरात डॉ. अशोक मुंडे वैद्यकीय अधिक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली, सत्यजीत टिप्रेसवार आरोग्य सहाय्यक  ग्रामीण रुग्णालय भोकर यांच्या पर्यवेक्षण व नियोजनानुसार हे अभियान राबविण्यात येत आहे. 

दि.१ जून ते ३१ जुलै पर्यंत भोकर शहरात घरोघरी भेट देऊन १८ वर्षे वरील व्यक्तीनी कोविडचा पहिला, दुसरा, बुस्टर डोस व १२ ते १८ वर्षे  दरम्यान व्यक्तीचे कोविडचा पहिला व दुसरा डोस लसीकरण झाले आहे का याची पाहणी व सर्वेक्षण करण्यात येत आहे. ज्या व्यक्तीचे वरील डोस झाले नाही त्यांना तिथेच कोविड लसीकरण करण्यात येत आहे. भोकर शहरातील नागरिकांना आव्हान करण्यात येते की, आपल्या घरी येणाऱ्या आरोग्य कर्मचारी, अंगणवाडी सेविका यांना आपल्या कुटुंबातील कोविड लसीकरणाची माहिती दयावी ज्या व्यक्तीने कोविड लसीकरण करून घेतले नाही त्यांनी लसीकरण करून घ्यावे व संभाव्य कोविड साथीचा बचाव करावा असे आव्हान डॉ अशोक मुंडे, सत्यजीत टिप्रेसवार यांनी केले आहे. तसेच ग्रामीण रुग्णालय भोकर येथे नियमित कोविड लसीकरण चालू आहे.

आज दि.७ जून रोजी शेख फरीदनगर जिल्हा परीषद शाळेच्या पाठीमागील  भागात हर घर दस्तक -२ अभियान राबविण्यात आले.आज ८६ घरांना भेटी देऊन १६ व्यक्तींना कोविड लसीकरण करण्यात आले.  पांडुरंग तम्मलवाड,नामदेव कंधारे आरोग्य कर्मचारी, श्रीमती सरस्वती दिवटे, संगीता पंदिलवाड आरोग्य सेविका यांनी लसीकरण केले. श्रीमती कांताबाई चंद्रे अंगणवाडी सेवीका,रमाबाई जाधव मदतनिस सोबत होते. ऑनलाईन नोंदणी ग्रामीण रुग्णालय भोकर येथे माया आडे डाटा ऑपरेटर यांनी केली.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी