आ.माधवराव पाटील जवळगावकर यांच्या मार्फत दिव्यांग शिबीराचे आयोजन
हदगांव। दिव्यांग कृत्रिम अवयव व सहाय्यभुत मोफत मोजमाप साधने पुर्व तपासणी हदगांव तालुक्यातील लोकप्रिय आमदार माधवराव पाटील जवळगांवकर यांच्या मार्फत हे दिव्यांग व्यक्ती करीता या शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.
सामाजिक न्याय व अधिकार मंत्रालय, भारत सरकार कृत्रिम अंग निर्माण निर्गम कानपुर, जिल्हा प्रशासन, समाज कल्याण जिल्हा परिषद नांदेड, ऊखळाई ग्रुप ऑफ एग्रो इंडस्ट्रीज हदगाव, दिव्यांग विकास संघर्ष समिती व मा.आ. माधवराव पाटील जवळगांवकर यांच्या संयुक्त विद्यमाने नांदेड जिल्ह्यात सर्व प्रथमच मा.आ. माधवरावजी पाटील जवळगांवकर यांच्या माध्यमातुन दिव्यांगासाठी कृत्रिम अवयव व मोफत सहाय्यभुत मोजमाप साधने साहित्य वाटप पुर्व तपासणी व नाव नोंदणी शिबीर हे दि.१८ जुन व दि.१९ जुन रोजी सकाळी ९:०० ते सायंकाळी ४:०० वाजेपर्यंत सुमन गार्डन मंगल कार्यालय डोंगरगांव रोड, हदगांव येथे दिव्यांग शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.
या शिबिरात दिव्यांगानी सोबत दिव्यांग प्रमाणपत्र, आधार कार्ड, राशन कार्ड, उत्पन्नाचे प्रमाणपत्र तलाठी/ तहसिलदार यांचे, दोन पासपोर्ट फोटोसह मुळ कागदपत्रासह सोबत ईतर कागदपत्रे आणावे. या शिबिरात दिव्यांगासाठी व्हिल चेअर, ट्राय सायकल, ट्राय मोटार सायकली,चष्मे, काठ्या, श्रवण यंत्रे, कुबड्या, ब्रेल किट, जयपुर फुट, ईत्यादी मोफत दिव्यांग सहाय्यभुत साधने पुर्व तपासणी करीता हदगांव- हिमायतनगर विधानसभा मतदारसंघातील व इतर तालुक्यातील सर्व दिव्यांग व्यक्तीने जास्तीत जास्त या शिबिराचा आवश्य लाभ घ्यावा असे आवाहन लोकप्रिय आमदार माधवरावजी पाटील जवळगांवकर यांनी केले आहे.
त्यांच्या सोबत दिव्यांग विकास संघर्ष समितीचे जिल्हाध्यक्ष समीर पटेल, ऊखळाई ग्रुप ऑफ एग्रो इंडस्ट्रीज हदगांवचे सतिष पाटील खानसोळे, दिव्यांग शाळेचे विशेष शिक्षक गजानन मोरे, उप विभागीय अधिकारी ब्रिजेश पाटील, जिवराज डापकर तहसिलदार हदगांव, गट विकास अधिकारी केशव गड्डापोड, न.पा.मुख्याधिकारी दामोदर जाधव, वैद्यकीय अधिकारी डॉ. व्हि.जी.ढगे, डॉ. प्रदिप स्वामी, पोलिस निरीक्षक हनुमंत गायकवाड, कृष्णा पवार,जि.प. शिक्षक वर्ग व परिचारीका आणि जिल्हा व तालुका काॅंग्रेस कमेटी हदगांव सह ईतर सर्व पदाधिकारी व मान्यवर यावेळी हजर होते....