मराठवाडा विभागीय वृत्तपत्र विक्रेता पदाधिकारी निवड बिनविरोध -NNL


नांदेड।
महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र विक्रेता संघटना मराठवाडा विभागातील नवीन कार्यकारिणी सदस्यांची बैठक दुपारी 03.00 वाजता पंजाब भवन, गुरूद्वारा नांदेड येथे संपन्न झाली. सदरील बैठकीत व्यवस्थापन सदस्य बालाजी पवार, विभागीय उपाध्यक्ष म्हणून अण्णासाहेब जगताप तर संघटन सचिव म्हणून लातूरचे जगदीश उमरदंड यांची  निवड बिनविरोध करण्यात आली. 

 निवडणूक अधिकारी (पर्यवेक्षक) म्हणून श्री रविंद्र कुलकर्णी, मालेगाव (नाशिक) हे होते.  यावेळी प्रमुख उपस्थिती माजी संघटन सचिव अंबादास खेडकर, गणेश वडगावकर यांची होती. नांदेड जिल्हा वृत्तपत्र वितरक विकास मंडळाच्या वतीने बैठकीची उत्तम व्यवस्था करण्यात आली होती. निवडणूक पुर्ण झाल्यानंतर सर्वांचे अभिनंदन जिल्हा संघटनेच्या वतीने करण्यात आले. यावेळी बोलतांना बालाजी पवार यांनी नवनिर्वाचित सदस्यांचे अभिनंदन केले. 

भविष्यात संघटनात्मक काम ताकदीने करून सदस्य वाढ, राज्य संघटनेने दिलेले कार्यक्रम, आँनलाईन सदस्य नोंदण्या, व वृत्तपत्र विक्रेता कल्याणकारी मंडळासाठी रस्त्यावर येण्याची तयारी करावी असे सांगितले. यावेळी सर्व सदस्यांनी आपापले मनोगत मांडले. अध्यक्षीय भाषणात रविंद्र कुलकर्णी यांनी संघटनेची भूमिका स्पष्ट करून कल्याणकारी मंडळ स्थापन करण्यासाठी सर्वांनी जिल्हा पातळीवरून राज्य संघटनेची ताकद वाढवण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन बाबू जल्देवार तर आभार चंद्रकांत घाटोळ यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संदिप कटकमवार, व्यंकटेश आनलदास यांनी मेहनत घेतली.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी