नांदेड। 24आज राष्ट्रवादी विद्यार्थी कॉग्रेसचे जिल्हाध्यक्ष कन्हैया कदम NSUI चे ज़िल्हाध्यक्ष शंकर शिंदे , भाजप विधार्थी अध्यक्ष अमोल ढगे नेतृत्वाखाली स्वामी रामानंदतीर्थ मराठवाडा विद्यापीठ येथे आता होऊ घातलेल्या परीक्षा ह्या MCQ पद्धतीने घेण्यात याव्या या मुख्य मागणीसाठी हजारो विद्यार्थ्यासह विद्यापीठ प्रशासनाच्या विरोधात तीव्र स्वरुपाचे आंदोलन करण्यात आले.
विद्यापीठ प्रशासनाने परिक्षा या ऑफलाईन तसेच Theory पद्धतीने घेण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे सर्व विद्यार्थ्यामध्ये तणावाचे वातावरण दिसून येत आहे. तसेच मागील सत्र हे 60%-70% ऑनलाईन पद्धतीने शिकवले आहे व मागील दिड ते दोन वर्षात झालेल्या परीक्षा या MCQ पद्धतीने घेतल्या गेल्या आहेत. तसेच विद्यार्थ्यांनी सुध्दा MCQ पद्धतीने परीक्षा होतील या हेतूने अभ्यास केला आहे.
परंतू विद्यापीठाने परीक्षा या Theory पद्धतीने होतील असा निर्णय घेतल्यामुळे विद्यार्थी हा मानसिकताणात आढळून येत असल्याचे दिसून येत आहे. तसेच बहुतांश विद्यापीठ हे परीक्षा MCQ पद्दतीने घेत आहे तर आपलं विद्यापीठ वेगळ्या पद्धतीने घेत आहे त्या विधार्थना वेगळा न्याय व स्वामी रामानंद तीर्थ पीठापाटातील विध्यार्थाना वेगळा न्याय दिला जातो हे दिसून येते .
यामुळे विद्यार्थ्याना मानसिक ताणातून मुक्त करण्यासाठी परीक्षा या MCQ पद्धतीने घ्याव्या ही मागणी करत आंदोलन करुन करण्यात आले यावेळी राष्ट्रवादी विद्यार्थी कॉग्रेसचे जिल्हाध्यक्ष कन्हैया कदम NSUI चे ज़िल्हाध्यक्ष शंकर शिंदे , भाजप विधार्थी अध्यक्ष अमोल ढगे ,अजिंक्य देशमुख , प्रबुद्ध चिते ,फैसल सिद्दीकि ,प्रतीक डेमनगुंडे ,प्रसाद पवार ,प्रथमेश लाटकर ,रोहित पवार यांच्या सह हजारो विधार्थी उपस्थितीत होती.