हरित भारत ऑलिम्पिक मॅरेथॉन व खेळाडूंच्या सन्मानाने ऑलिंपिक क्रीडा सप्ताहाचा 29 जूनला समारोप -NNL

आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक दिन व स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त जिल्हा क्रीडा अधिकारी 


नांदेड।
नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका नांदेड  ,व ओलंपिक असोसिएशन नांदेडच्या वतीने 23 जून ते 29 जून 2022 दरम्यान आयोजित क्रीडा सप्ताहाचा समारोप 29 जून रोजी सकाळी 7 वाजता हरित भारत ऑलम्पिक मॅराथॉन व सायंकाळी पाच वाजता सप्ताहात घेण्यात आलेल्या स्पर्धांचा बक्षीस वितरण व पदाधिकारी तसेच खेळाडूंच्या सन्मानाने शंकरराव चव्हाण प्रेक्षागृहात करण्यात येणार असल्याची माहिती ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्ष शिवछत्रपती पुरस्कार विजेते रमेश पारे महासचिव बालाजी पाटील जोगदंड यांनी दिली आहे.                                     

हरित भारत ओलंपिक रॅली राज कॉर्नर येथून सकाळी सात वाजता महापौर जयश्रीताई पावडे ,महिला बालकल्याण सभापती अपर्णाताई नेरळकर  ,गोदावरी अर्बन बँकेच्या अध्यक्ष सौ राजश्रीताई पाटील  ,इंदिरा गांधी महाविद्यालयाचे प्राचार्य एस एल माचलोड  , सामाजीक कार्यकर्ते दिलीप ठाकूर ,जिल्हा क्रीडा अधिकारी राजेश्वर मारावार  ,शिवछत्रपती पुरस्कार विजेते जनार्दन गोपीले  ,सहाय्यक आयुक्त रमेश चौरे  ,अवतारसिंग रामगडिया यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.

सायंकाळी पाच वाजता समारोप कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी विशेष पोलीस महानिरीक्षक निसार तांबोळी लड्डू सिंग महाजन  ,महापौर जयश्रीताई पावडे  ,विक्रांत खेडकर  ,अपर्णाताई, डॉ. रमेश नांदेडकर  ,प्राध्यापक जयपाल रेड्डी  ,प्रलोभ कुलकर्णी  ,प्रवीण कुपटीकर वृषाली पाटील जोगदंड प्रणिता रेड्डी  ,डॉ. शशी गायकवाड डॉ. दिनकर हंबर्डे डॉ. राहुल वाघमारे बाबुराव खंदारे ,एकनाथ पाटील राजुरी स्टीलचे विशाल मुधोळकर  ,गोविंद मुळे शुभंकरोती व देसाई फाऊंडेशनचे किरण चौधरी शिवकांता देशमुख , संजय चव्हाण  ,प्रशांत वावधाने यांची प्रमुख उपस्थिती राहणार असून सायंकाळी होणाऱ्या समारोप कार्यक्रमात सप्ताहात देण्यात आलेल्या तायक्वांदो  ,बुद्धिबळ  ,कराटे , चित्रकला  ,सायकल रॅली , मशाल रॅली निबंध स्पर्धा वक्तृत्व स्पर्धेतील विजेत्यांना रोख रक्कम आणि पदक प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात येणार आहे  .तसेच सदरील सप्ताह यशस्वी करणाऱ्या सर्व पदाधिकारी यांचा विशेष सन्मान करण्यात येणार असल्याची माहिती आयोजन सचिव बालाजी पाटील जोगदंड यांनी दिली आहे.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी