नांदेड| जिल्ह्यात गुरुवार 23 जून रोजी सकाळी 10 वा. संपलेल्या गत 24 तासात सरासरी 6.8 मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून जिल्ह्यात एकुण 94.3 मिलीमीटर पाऊस झाला आहे. यामुळे शेतकऱ्यांना समाधान झाले असले तरी पेरणीसाठी शेतकर्यांनाही आणखी मोठ्या पावसाची प्रतीक्षा आहे.
जिल्ह्यात गुरुवार 23 जून रोजी सकाळी 10 वा. संपलेल्या गत 24 तासात झालेला पाऊस मिलीमीटर मध्ये तालुकानिहाय पुढील प्रमाणे, कंसात एकूण पाऊस : नांदेड- 17.2 (100.5), बिलोली-00 (58.1), मुखेड- 5.7 (110.7), कंधार-12.8 (120.5), लोहा-6.7 (76.2), हदगाव-6.2 (80.7), भोकर- 2 (71.9), देगलूर-4.5 (132.5), किनवट- 2.1 (102.1), मुदखेड- 26 (156.7), हिमायतनगर-9 (105.3), माहूर- 0.5 (89.5), धर्माबाद- 00 (50.3), उमरी- 6.4 (107.1), अर्धापूर- 13.9 (78.4), नायगाव- 0.4 (51.8) मिलीमीटर आहे.