नविन नांदेड। नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेच्या सिडको क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत असलेल्या अनेक प्रलंबित कामाचा निपटारा नवनियुक्त क्षेत्रीय अधिकारी डॉ रईसोधदीन यांनी कर्मचाऱ्यांच्या साह्याने केली असुन सुत्रे हाती घेतल्या नंतर स्वच्छता सह विघुत विभागाचे अनेक प्रश्न सोडविण्यासाठी पुढाकार घेतला असुन नाव परिवर्तन सह अनेक प्रलंबित संचिका त्रुटी काढून निकाली काढल्या आहेत.
सिडको क्षेत्रीय कार्यालय येथे डॉ.रईसौधदीन यांनी 11मे रोजी पदभार स्वीकारल्यानंतर प्रथम कार्यालयीन अधिक्षक विलास गजभारे कर्मचारी व वसुली कर निरीक्षक दिपक पाटील, सुधिर बैस लिपीक, स्वच्छता विभागाचे स्वच्छता निरीक्षक ,साफ सफाई कामगार, यांच्यी बैठक घेऊन वसुलीसाठी प्रथम प्राधान्य देऊन थकीत मालमत्ता धारक यांच्या कडे संबंधितांनी तगादा लावुन वसुली करून मनपा उत्पन्न वाढीसाठी विशेष प्रयत्न करावे असे सुचित केले तर स्वच्छता विभागाच्या स्वच्छता निरीक्षक किशन वाघमारे,अरजृन बागडी व सफाई कामगार यांना पावसाळ्या पुर्व परिसरातील नाले,सखल भागात पाणी साचल्याने ठिकाणी साफसफाई व दैनंदिन सफाई ला प्राधान्य देण्याचे सुचित केले,व नाल्यांच्या सफाई ला प्रांरभ केला.
कार्यालय अंतर्गत असलेल्या नाव परिवर्तन यासह जन्म मृत्यू दाखला, मालमत्ता धारक यांच्ये प्रलंबित असलेल्या अनेक प्रश्न निकाली काढण्यासाठी कर्मचाऱ्यांच्या आदेशित करून त्रुटया सोडून नाव परिवर्तन अनेक प्रलंबित संचिका सोडविल्या तर पथदिवे बंद अवस्थेत असलेल्या मुख्य व अंतर्गत भागातील सोडविण्याचा सुचना देऊन तात्काळ बंद पथदिवे चालु करण्याचे काम चालू केले असून क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत असलेल्या कर्मचारी यांना ओळख पत्र बंधनकारक करण्यात आले.व नागरीकांच्या तक्रारी तात्काळ व प्रलंबित असलेल्या सोडविण्याचे आदेशित केले आहे.
आठ दिवसांत कार्यालय अंतर्गत सुसज्ज प्रत्येक विभागाची सफाई व कर्मचारी यांच्यी उपस्थिती या मुळे क्षेत्रीय अधिकारी डॉ रईसोधदीन यांनी ईतर विभागात असलेली वचक पाहता क्षेत्रीय कार्यालय आठ दिवसांत केलेली कामगिरी उत्कृष्ट असल्याचे अनेकांनी सांगितले.